जालना : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. आज सकाळी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर बेतलेल्या प्रसंगाची त्यांना माहिती दिली.संजय राऊतांशीही बोललो. सगळ्यांची मते जाणून घेऊन मी शिंदेगटात (shinde group)जाण्याचा निर्णय घेतला,' असे शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेते नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) म्हणाले. (arjun khotkar latest news)
खोतकरांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिले. खोतकर शिंदे गटात गेल्याने मराठवाड्यात शिवसेनेला घरघर लागली असे बोलले जात आहे. खोतकर म्हणाले,"समर्थन केलं म्हणजे संबंध थोडीच तुटतात, आमचे 40 वर्षांचे संबंध आहेत. मी पक्ष प्रमुखांना चार वेळा फोन केला, त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना पूर्ण कल्पना दिली, कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे मी हा निर्णय घेत आहे" हे सांगताना त्यांना गहिवरुन आले.
"घरी आलो की कुटुंब दिसते. त्यामुळे काही ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. या गोष्टी मी उद्धव ठाकरेंच्याही कानावर घातल्या. त्यांनीही मला माझा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे,' असे खोतकरांनी स्पष्ट केले.
"कायमच आयुष्यभर शिवसेनेतच राहणार,"असा दावा करणारे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. त्यानंतर ते शिंदे गटात जाणार अशा बातम्या गेले काही दिवस माध्यमात येत होत्या. या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला.
"मी सच्चा शिवसैनिक आहे. मी एकनाथ शिंदेंना समर्थन करीत आहे. शिंदे गटात जाण्याचा मी निर्णय घेतला आहे," असे खोतकर यांनी जाहीर केलं. 'परिस्थितीनुसार मी हा निर्णय घेत आहे,' असे ते म्हणाले. शिंदे गटात जाण्याबाबत मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली होती, असे खोतकर म्हणाले.
काही दिवसापूर्वी अर्जुन खोतकर-एकनाथ शिंदे यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याचाही एक व्हिडिओ समोर आला होता. अर्जुन खोतकर हे काल (शुक्रवारी) थेट दिल्लीवरून जालना शहरात असलेल्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाले. अर्जुन खोतकर आपल्या दर्शना बंगल्यासमोर येताच कार्यकर्त्यांकडून फटाके उडविण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी करीत खोतकरांच स्वागत केलं.
खोतकर यांनी काल निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला.कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेतला. खोतकर समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांच्या बरोबर अर्जुन खोतकर यांचा फोटो लावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.