Sarkarnama
मराठवाडा

Latur BJP News : चाकूरकरांच्या पाठीत देशमुखांनीच खंजीर खुपसला, निलंगेकरांचा आरोप...

माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जोरदार बॅटिंग करताना लातूरच्या देशमुख अ‍ॅन्ड कंपनीवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मराठवाड्यात दोन बड्या काँग्रेस घराण्यांना धक्का दिला आहे.

Jagdish Pansare

Latur loksabha Constituency : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील यांचा मुंबई भाजप प्रदेश कार्यालात प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जोरदार बॅटिंग करताना लातूरच्या देशमुख अ‍ॅन्ड कंपनीवर टीका केली. Marathwada Latest News Politics

शिवराज पाटील चाकूरकर यांचा 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव देशमुख आणि काँग्रेसच्या मंडळीनेच केला. बसवराज पाटील यांच्या विरोधात अभिमन्यू पवार निवडून आले, तेव्हाही काँग्रेसच्या देशमुख अ‍ॅन्ड कंपनीनेच पाटलांच्या विरोधात काम केल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला. हा आरोप करताना एकप्रकारे लातुरात देशमुखांसोबत असलेल्या भाजपच्या सेटलमेंटलाच दुजोरा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Latest News loksabha Election Politics

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने (BJP) मराठवाड्यात दोन बड्या काँग्रेस घराण्यांना धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने पहिला धक्का नांदेडला आणि आता त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या सूनबाई अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रवेशाने लातूरला बसला. आज मुबंईत फडणवीस, बावनकुळे आणि भाजपच्या लातूर जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

या वेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गाडी चांगलीच फॉर्मात आली होती. आपल्या दोन मिनिटांच्या भाषणात निलंगेकर यांनी लातूरच्या देशमुखांवर टीका करतानाच पक्षातील सेटलमेंटच्या राजकारणाचाही भांडाफोड केल्याचे दिसून आले. लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना संपवण्याचे काम देशमुख अ‍ॅन्ड कंपनीने केल्याचा आरोप करताना 2004 च्या लोकसभा निवडणुकीत रूपाताई पाटील निलंगेकर विजयी झाल्या, तेव्हा चाकूरकरांच्या विरोधात देशमुख आणि मंडळीनेचे काम केले होते, असा दावा त्यांनी केला.

एवढेच नाही, तर 2019 मध्ये औसा विधानसभा मतदारसंघातून बसवराज पाटील यांच्या विरोधात भाजपने अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. तेव्हाही बसवराज पाटील यांच्या विरोधात देशमुख अ‍ॅन्ड कंपनीनेच काम केले होते, असा आरोप करत निलंगेकर यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला संभाजी निलंगेकर यांचा विरोध होता हे लपून राहिलेले नाही. त्यांचा विरोध असताना देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिली होती. त्याची सल निलंगेकरांनी आज देशमुखांवर टीका करत बोलून दाखवली.

शिवराज पाटील चाकूरकर, बसवराज पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कोणी केले असेल तर ते काँग्रेसच्या अमित देशमुख आणि त्यांच्या कंपनीने, असा घणाघात निलंगेकर यांनी फडणवीस, बावनकुळे, आमदार अभिमन्यू पवार यांच्या समक्षच केला. अमित देशमुख व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी चाकूरकर, बसवराज पाटील यांच्यावर अन्याय कसा केला? हे सांगतानाच अप्रत्यक्षपणे निलंगेकरांनी काँग्रेस आणि भाजपमधील सेटलमेंटच्या राजकारणाचा मुद्दा छेडत अभिमन्यू पवार यांना टार्गेट केल्याचेही दिसून आले.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT