Harshvardhan Jadhav News  Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव दुसऱ्यांदा बोहल्यावर; कोण आहेत ईशा झा...

Mangesh Mahale

Chhatrapati Sambhajinagar : भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते, माजी आमदार हर्षवर्धन जाधव दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. आपली मैत्रीण ईशा झा यांच्यासोबत त्यांनी लगीनगाठ बांधली आहे. या विवाह सोहळ्याचे फोटो त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.

हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत कायम दिसणाऱ्या ईशा झा यांनी काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ शेअर केल्यामुळे जाधव अडचणीत आले होते. मारहाण केल्याचा आरोप ईशा झा यांनी केला होता. मराठा आंदोलनावेळी हर्षवर्धन जाधव यांनी जी युवा मन परिवर्तन यात्रा काढली होती. त्या यात्रेतही मराठवाडा दौऱ्यावर जाधव यांच्यासोबत ईशा झा दिसून आल्या होत्या.

एका मेळाव्यात हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव आणि स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या भाषणात ईशा यांचा उल्लेख केला आणि जनतेला त्यांची ओळख करून दिली होती.

दोन महिन्यांपूर्वी ईशा झा आणि आपले नाते संपल्याचे जाधव यांनी जाहीर केले होते. यापूर्वी संजना जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचा घटस्फोट झाला आहे. संजना या भाजप नेते, मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.

कोण आहेत, हर्षवर्धन जाधव

  • हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडचे माजी आमदार आहेत.

  • कन्नड साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही निवडून आले होते.

  • मनसेच्या तिकिटावर 2009 मध्ये ते विधानसभेवर निवडूनही आले होते.

  • त्यांनी2014 ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. ते आमदार म्हणून निवडून आले होते

कोण आहेत ईशा झा

  • ईशा झा या मुळच्या बिहारच्या आहेत.त्याचे शिक्षण मुंबई झाले आहे.

  • क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये त्यांनी एमएस केलं आहे. त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत.

  • ईशा झा यांची प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ म्हणून ओळख आहे.

  • क्रोध व्यवस्थापनातही त्यांचं मोठं नाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT