Suryakanta Patil Sarkarnama
मराठवाडा

Video Suryakanta Patil : दोन दिवसांपूर्वी भाजपला रामराम, आज शरद पवार गटात प्रवेश? माजी केंद्रीय मंत्र्याचा मोठा निर्णय

Suryakanta Patil Will be join NCP Sharad Pawar : भाजपात प्रवेशानंतर मागील 10 वर्षांपासून भाजपने पाटील यांना कोणतीही जवाबदारी दिली नाही.पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेत सूर्यकांता पाटील यांना सहभागी करून घेतले जात नव्हते.

Roshan More

Suryakanta Patil News : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शनिवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतर आज (सोमवार)त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मागील 10 वर्षांपासून सूर्यकांता पाटील या भाजपामध्ये काम करीत होत्या. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश हा मुंबईत होण्याची शक्यता आहे.

सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar यांच्या सोबत अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्रिपदी संधी दिली होती. परंतु 10 वर्षांपूर्वी भाजपची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सुर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता.

भाजपात प्रवेशानंतर मागील 10 वर्षांपासून भाजपने पाटील यांना कोणतीही जवाबदारी दिली नाही.पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेत पाटील Suryakanta Patil यांना सहभागी करून घेतले जात नव्हते. महत्वाचे निर्णय घेतांना त्यांचे मत विचारात घेतले जात नव्हते. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला.

नांदेडमध्ये फटका

नांदेड जिल्ह्यात सुर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाची ताकत या भागात वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT