Jalyukt Shiwar Yojna, Beed Sarkarnama
मराठवाडा

दोन कोटींच्या जलयुक्त घोटाळा प्रकरणी दोन निवृत्त कृषी अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

फरार चौघे परळीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना मिळाली होती. (Beed News)

सरकारनामा ब्युरो

बीड : परळीत चार वर्षांपूर्वी गाजलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. (Scam) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. १४) ही कारवाई केली. (Beed) यामध्ये कृषी विभागाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह विद्यमान दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शिवाजी शंकरराव हजारे (रा.अंबाजोगाई), विजयकुमार अरुण भताने, पांडुरंग जगन्नाथ जंगमे, अमोल मारोतीराव कराड (तिघे रा.परळी) अशी आरोपींची नावे आहेत. (Marathwada) हजारे व भताने हे निवृत्त तालुका कृषी अधिकारी असून कराड व जंगमे हे कृषी सहायक म्हणून सध्या सेवेत आहेत.

२०१८ मध्ये परळीत जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले होते. सुमारे दोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अधिकारी व कंत्राटदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले होते. अधिकाऱ्यांवर परळी शहर ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यांत १२ जणांना अटक केली होती, उर्वरित फरार होते.

आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण तपासासाठी होते. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र पाठविले होते. दरम्यान, फरार चौघे परळीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना मिळाली होती.

त्यानुसार, १४ मार्चला त्यांनी सहायक निरीक्षक प्रमोद भिंगारे, हवालदार मुकुंद तांदळे, राम बहिरवाळ, पोलीस नाईक राजू पठाण, पोलीस अंमलदार संजय पवार यांना रवाना केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT