Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Marathwada Teachers Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency : चौदा उमेदवार रिंगणात, पण खरी लढत काळे-पाटील यांच्यातच..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १५ पैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. (Marathwada Teacher Constituency) त्यामुळे १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉ.गणेश वीरभद्र शेटकर या अपक्ष उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे.

आता निवडणूक रिंगणात १४ उमेदवार असले तरी खरी लढत ही (Bjp) महाविकास आघाडी-भाजप आणि वंचित या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच होण्याची शक्यता आहे. (Vanchit Aghadi) वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामीण भागात आपल्या पक्षाला मोठी मदत मिळू शकते असा दावा केला आहे.

तर विक्रम काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. भाजपने किरण पाटील या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवत विक्रम काळे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. तर वंचितच्या कालिदास माने यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आल्याचे बोलले जाते.

माघारीनंतर आता हे उमेदवार रिंगणात..

काळे विक्रम वसंतराव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव - भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव - वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील - अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) - अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख - अपक्ष.

कादरी शाहेद अब्दुल गफुर - अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी - अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके - अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील - अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर - अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव - अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे - अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे - अपक्ष असे एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT