Gangadhar Kalkute Reaction On dhananjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

Gangadhar Kalkute News : पंचवीस कोटी अन् विधान परिषदेची ऑफर नाकारली, गंगाधर काळकूटेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार!

Gangadhar Kalkute On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यासोबत आपली मैत्री होती, पण जेव्हा त्यांच्या वाल्मिक कराडने संतोषअण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या केली, त्या दिवशीपासून आमची मैत्री तुटल्याचे काळकुटे यांनी सांगितले.

Jagdish Pansare

  1. धनंजय मुंडेंनी ‘गंगाधर काळकुटे माझा मित्र आहे’ असं वक्तव्य केल्यानंतर काळकुटेंनी मोठा पलटवार केला आहे.

  2. काळकुटेंनी २५ कोटींची रक्कम आणि विधान परिषदेची ऑफर नाकारल्याचा धक्कादायक दावा केला.

  3. या दाव्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा पेटलं असून खळबळ माजली आहे.

Beed Politics : मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचे नाव काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेतले. काळकुटे माझा मित्र आहे, तो माझ्याकडे आठ आठ तास कशासाठी थांबत होता? बीडमधून लोकसभेसाठी त्याने अर्ज भरला असे सांगून मुंडे यांनी काही दावे केले होते. त्यानंतर गंगाधर काळकुटे यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी माझा मित्र म्हणून उल्लेख केला. मला समाजात बदनाम करण्याचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यापासून तोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.

माझ्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न मी हाणून पाडणार, असे सांगत काळकुटे यांनी अनेक दावे आणि खुलासे केले. लोकसभा निवडणुकीत लोकशाहीने दिलेल्या अधिकारातून आपण उमेदवारी अर्ज भरला होता. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर आपण माघार घेतली. धनंजय मुंडे यांनी मी माघार घेऊ नये म्हणून पंचवीस कोटी रुपये आणि विधान परिषदेवर आमदार करण्याची ऑफर मला दिली होती. पण ती ऑफर आपण धुडकावून लावली, असा दावा काळकुटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

धनंजय मुंडे यांच्यासोबत आपली मैत्री होती, पण जेव्हा त्यांच्या वाल्मिक कराडने संतोषअण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या केली, त्या दिवशीपासून आमची मैत्री तुटल्याचे काळकुटे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या भल्यासाठी, आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालो, मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत गेलो म्हणून संतोष देशमुख यांच्याप्रमाणे माझीही हत्या करणार होते, पण वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यामुळे मी वाचलो. मला संपवण्याचे प्रयत्न यापुढेही केले जाऊ शकतात, माझ्या जीवाला धोका आहे, पण मी घाबरत नाही, असे सांगत काळकुटे यांनी आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगितले.

मुंडे यांनी माझ्या अनेक रेकाॅर्डिंग असल्याचा दावा काल केला, त्यांच्याकडे आहे, तशा आमच्याकडेही त्यांच्या आहेत. योग्यवेळ आली की आम्हीही त्या समोर आणू, असे म्हणत काळकुटे यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. माझ्याबद्दल मनोज जरांगे व समाजामध्ये धनंजय मुंडे यांनी संभ्रम निर्माण केला आहे. संतोष देशमुख यांच्या खुनानंतर तुमची आणि माझी मैत्री संपली. देशमुख यांच्यानंतर माझा नंबर आकाने (वाल्मिक कराड) लावला होता. त्याचे रेकॉर्डिंग आणि पुरावे माझ्याकडे आहेत. जरांगे पाटलांच्या सांगण्यावरुन आपण लोकसभेतून माघार घेतली असेही काळकुटे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेवेळी आपल्या भावाला दिलेल्या निरोपाचे रेकॉर्डींग आपण ऐकवणार असून आपण ऑफर नाकारल्याने मला डुकरासारखं ओढून नेतो असं तुमचे लोक म्हणाले होते. ओबीसी सभेत सुतळी बॉम्ब टाकून मला अडकवायचं ठरवलं होतं. आपण आणलेली कामे वाल्मीक कराडने अडवली, असा आरोपही काळकुटे यांनी केला. संतोष देशमुख प्रकरण आणि महादेव मुंडे प्रकरणात आम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लोकांनी धमक्या दिल्या.

तुम्ही मित्र म्हणण्याच्या पुढे गेले आहात, मला मित्र म्हणून संभ्रम निर्माण करु नका. माझी आणि तुमची एकच भेट झाली, असेही त्यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हटले. सभेनंतर मुंडेंचे अनेक फोन आल्याचे रेकॉर्डिंग आहेत. मनोज जरांगे व माझ्या खुनाचा प्रयत्न केला. मला मारण्यासाठी तुमच्या लोकांनी गुंड पाठवले, असा आरोपही काळकुटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

FAQs

1. धनंजय मुंडेंनी काय वक्तव्य केलं होतं?
➡️ त्यांनी गंगाधर काळकुटे हे त्यांचे मित्र असल्याचं सांगितलं होतं.

2. गंगाधर काळकुटेंनी कशी प्रतिक्रिया दिली?
➡️ त्यांनी २५ कोटी आणि विधान परिषदेची ऑफर नाकारल्याचा दावा करून मुंडेंवर पलटवार केला.

3. ही घटना कुठे घडली?
➡️ बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकीय पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली.

4. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे?
➡️ अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी पक्षात चर्चेला उधाण आलं आहे.

5. या आरोपांचा पुढील राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ बीड आणि मराठवाडा राजकारणात नव्या तणावाची आणि गटबाजीची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT