Gangakhed APMC Election  Sarkarnama
मराठवाडा

Gangakhed APMC Election : आमदार गुट्टेच्या गंगाखेडमध्ये तिरंगी लढत; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला..

Parbhani District : आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी बळीराजा शेती विकास पॅनलच्या माध्यमातून ताकद लावली आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Gangakhed APMC Election) आपल्याच पॅनलला एकतर्फी विजय मिळावा यासाठी दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप-रिपाइं व इतर पक्षांचे देखील पॅनल मैदानात असल्यामुळे इथे तिरंगी लढत होत आहे. गंगाखेड बाजार समिती लक्ष्मी दर्शनसाठी ओळखले जाते, त्यामुळे जे पॅनल मतदारांना ते घडवेल त्याचीच सत्ता अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

परंतु सद्यस्थितीत कोणत्याही एका पॅनलला एकतर्फी विजय मिळेच असे ठामपणे सांगता येत नाही. (Parbhani) गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी एकूण २२१५ मतदार संख्या आहे. (Ratnakar Gutte) यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघ, ग्रामपंचायतीचा मतदारसंघ, व्यापारी /आडते मतदार संघ, हमाल व तोलाई मतदारसंघातील मतदानसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

निवडणुकीमध्ये खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, माजी आमदार सिताराम घनदाट, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, बाळकाका चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप यांनी मिळून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शेतकरी विकास पॅनल उभे केले आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप यांच्याकडेही सोसायटीच्या मतदारांचे संख्याबळ आहे.

विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी बळीराजा शेती विकास पॅनलच्या माध्यमातून ताकद लावली आहे. गुट्टे यांनी गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतीस भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालासाहेब निरस यांचा अनुभव देखील त्यांना निवडणुकीत कामाला येणार आहे. भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार रासपाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या बळीराजा शेती विकास पॅनलचा प्रचार सुरू केला आहे.

त्यामुळे गुट्टे यांच्या बळीराजा शेती विकास पॅनलचे पारडे जड मानले जाते. मदतीचा हात म्हणून परिचित असणारे भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य संतोष मुरकुटे यांनी भाजपा, शिवसेना, रिपाई, मनसे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीसह गुट्टे यांच्या पॅनलला आव्हान दिले आहे. संतोष मुरकुटे यांनी मदतीचा हातच्या माध्यमातून केलेली कामे त्यांना तारू शकतात. बाजार समितीच्या सहकारी संस्था मतदार संघ - ४५४, ग्रामपंचायतीचा मतदारसंघ - ७०६, व्यापारी/ आडते मतदारसंघ, - ५४०, हमाल व तोलाई मतदार संघ - ५१५ असे एकूण २२१५ मतदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT