Gangakhed Assembly election 2024 abhijit deshmukh political campaign for vishal kadam 
मराठवाडा

Gangakhed Assembly Constituency : विकासासाठी विशाल कदम यांना विजयी करा - अभिजित देशमुख

महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी त्यांचा जोमाने प्रचार करा. मतदारसंघाच्या विकासासाठी विशाल कदम यांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख यांनी केले.

सरकारनामा ब्यूरो

पालम : महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी त्यांचा जोमाने प्रचार करा. मतदारसंघाच्या विकासासाठी विशाल कदम यांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख यांनी केले.

महाविकास आघाडीचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पालम तालुका काँग्रेस कमिटी व अभिजित भैया देशमुख मित्रमंडळाची बैठक रविवारी मोंढा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार संजय (बंडू) जाधव, काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख, उमेदवार विशाल कदम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव शिरसकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सहसचिव ॲड. राहुल हत्तीबिरे,

मारोती बनसोडे, डी. के. कदम, गजानन आंबोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, उपाध्यक्ष माधवराव फाजगे, अकबर खान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य येंगडे आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार संजय जाधव, अभिजितभैया देशमुख, कृष्णा भोसले, अकबरखा पठाण यांनी गंगाखेड मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ जोमाने कामाला लागून विशाल कदम यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे मुंजाअण्णा कदम, बाबूरावजी लांडगे, काँग्रेसचे पालम शहराध्यक्ष शेख अहमद, मुकुंद पाटील, हबीब भाई चाऊस, साबीर भाई कुरेशी, अब्रार भाई काजी, शेख मेहबूब भाई, गोविंदराव जाधव, शरद येरमे, किरण लांडगे, शिवाजी पुणे आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन माधवराव फाजगे यांनी, तर आभार अभिजितभैया देशमुख मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष अकबर खान पठाण यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT