Swapnil Galdhar Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर बीडमध्ये 'सकल मराठा' समाजाने घेतला 'हा' निर्णय!

Swapnil Galdhar News : 'मीही रिंगणात आणि मीही खासदार' ॲड. स्वप्नील गलधर यांनी केले जाहीर

दत्ता देशमुख :सरकारनामा ब्युरो

Beed Loksabha Election 2024 News : सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण मान्य नाही, सगेसोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर समाज आजही ठामपणे त्यांच्या मागे उभा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावांतून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा ठराव, शनिवारी बीडमध्ये झालेल्या ‘सकल मराठा’ समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्नील गलधर यांनी देखील मीही रिंगणात आणि मीही खासदार असे जाहीर केले.

ॲड. गलधर यांनी बैठकीत घेतलेली भूमिका सोशल मिडीयावरही जाहीर केल्यानंतर समाजातून उस्त्फुर्त प्रतिक्रिया तर आल्याच शिवाय भाजपाच्या अनेकजणांच्या भुवयाही यामुळे उंचावल्या आहेत. या बैठकीत प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार उभा करण्याचा ठराव झाला. अडीच हजारांहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीत अनेकांनी आपणही उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र, भाजपा तालुकाध्यक्ष असलेले व मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या स्वप्नील गलधर यांच्या भूमिकेमुळे भाजपातील अनेकजणांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आरक्षण नाही तर निवडणूक नाही, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशेहून अधिक उमेदवारांची संख्या झाली तर ती निवडणूक रद्द करावी लागते, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मनोज जरांगे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, राजकीय स्टेजवर आणि कार्यक्रमांना समाज जाणार नाही, 10 टक्के आरक्षण मान्य नाही, सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी करावी, आदी ठराव यावेळी घेण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT