Beed News: एकेकाळी पवार विरुद्ध पंडित आणि पुढे पंडित विरुद्ध पंडित तर 10 वर्षांपासून पुन्हा पवार विरुध्द पंडित असा राजकीय सामना असलेल्या गेवराई मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पंडित असा तिरंगी सामना रंगणार हे निश्चित झाले आहे.
या मतदारसंघातील भाजप आमदार ॲड लक्ष्मण पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात होते. पण,आता आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी मंत्री बदामराव पंडित (Badramao Pandit) यांना कामाला लागा असे सांगितले आहे.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबूक पेजवरून ही माहिती दिली आहे. 'माजी आमदार बदामराव पंडित यांच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या संबंधाने असणारा गोंधळ दूर करत गेवराईच्या जागेवर फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हक्क आहे. बदामरावजी, आपण बिनधास्त कामाला लागा, असे सन्माननीय नेते आदित्यजी यांनी ठामपणे सांगितले' अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी लिहिली आहे.
आता गेवराई मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता पवार कोणता झेंडा हाती घेणार हे पहावे लागणार आहे.
2014 मध्ये लक्ष्मण पवार यांनी भाजपकडून पहिल्यांदा निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेसचे बदामराव पंडित यांचा 65 हजार मतांनी पराभव केला होता. तर, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण पवार यांचे मताधिक्य केवळ सात हजारांवर आणले. त्या निवडणुकीत बदामराव पंडित मोठ्या पिछाडीवर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी बदामराव पंडित यांची भेट घेतली होती. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सुटून पंडित यांना उमेदवारी मिळेल असे पूर्वीपासूनच संकेत होते. यावर आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिक्कामोर्तेब केले आहे.
बदामराव पंडित व त्यांच्या पत्नी गिरिकाभाभी यांनी आदित्य ठाकरे यांची सुषमा अंधारे यांच्या उपास्थितीत भेट घेतली. या भेटीचा फोटोसह 'माजी आमदार बदामराव पंडित यांच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या संबंधाने असणारा गोंधळ दूर करत गेवराईच्या जागेवर फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हक्क आहे. बदामरावजी, आपण बिनधास्त कामाला लागा, असे सन्माननीय नेते आदित्यजी यांनी ठामपणे सांगितले' असा मजकूर शेअर केला आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे तसेच भाजपच्या कार्यप्रणालीवर टीका करीत आपण निवडणूक लढणार नाही, असे लक्ष्मण पवार यांनी जाहीर केलेले आहे. या मतदार संघातून लोकसभेला पंकजा मुंडे यांना मोठी पिछाडीवर होत्या. त्यामळे मुंडे समर्थक देखील लक्ष्मण पवार यांच्यावर नाराज होते. आता पवार कोणता झेंडा घेणार हे पाहावे लागणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.