David Ghumare, Gopichand Padalkar Sarkarnama
मराठवाडा

Gopichand Padalkar vs VBA : "...तर त्यांच्या तोंडाला काळं फासणार"; गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Sangli Rutuja suicide case : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबाबत एक वादग्रस्त केलं आहे. या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण पडळकरांविरोधात राज्यभरातील ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला आहे.

Jagdish Patil

Jalna News, 02 Jul : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबाबत एक वादग्रस्त केलं आहे. या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण पडळकरांविरोधात राज्यभरातील ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला आहे.

सांगली, अहिल्यानगर, भंडारा, उल्हासनगरसह जालन्यात ख्रिश्चन समाजाने मोर्चे काढत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता पडळकरांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडी आक्रमक झाली आहे.

गोपिचंद पडळकरांना मराठवाड्यात फिरू देणार नाही आणि जर ते मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा जालन्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला आहे.

शिवाय पडळकरांविरोधात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. डेव्हिड घुमारे म्हणाले, "सत्तेतील एखादा आमदार खून केला तर 11 लाखाचं बक्षीस देतो असं म्हणतो, म्हणजे हा सुपारी देऊन हत्या करण्याचा हा प्रकार असून हा खूप मोठा गुन्हा आहे.

त्यामुळे शासनाने गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. त्यांची आमदारकी रद्द करावी." जर सरकारने असं केलं नाही, तर आम्ही वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रात काय आहे ते दाखवून देऊ त्यांना आम्ही फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा वंचित आघाडीने घेतला आहे.

शिवाय राज्य सरकार ख्रिश्चन समाजाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील डेव्हिड घुमारे यांनी केला. ते म्हणाले, "ख्रिश्चन हा शांतिप्रिय समाज आहे. मात्र, तो मतदानाच्या रुपाने भाजपसोबत नसल्यामुळे यांच्यासोबत कसंही वागलं तरी चालेल अशी यांची भावना सरकारची झाली आहे. मात्र, आमची राज्यातील ताकद मतांच्या रुपाने दाखवून देऊ."

पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

सांगली येथील ऋतुजा नावाच्या गर्भवती महिलेला धर्मांतर करण्यासाठी ख्रिश्चन पादरी दबाव टाकत होता आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याच प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन पादरीविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं.

बैलगाडा शर्यतीसाठी ज्याप्रमाणे बक्षीस ठेवलं जातं त्याचप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीला ठोकण्यासाठी बक्षीस ठेवलं पाहिजे. पहिल्या पादरीला जो ठोकेल त्याला पाच लाख, दुसऱ्याला मारेल त्याला चार लाख आणि तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाख आणि जो कुणी पादरीचा सैराट करेल, त्याला अकरा लाखांचे बक्षीस दिले पाहिजे, असं पडळकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे ख्रिश्चन समाज आता आक्रमक झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT