Pankaja Munde Appeal News  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News: मुंडेसाहेब सोडून गेले, तो आपल्याला न आवडणारा दिवस येतोय..

Beed News: मुंडेसाहेबांचे भक्त, चाहते म्हणून आपण त्यांच्या जाण्याच्या दिवसातून देखील प्रेरणा घेत असतो.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून रोजी नववे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी गोपीनाथ गडावर येण्याचे आवाहन मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना केले आहे. (Pankaja Munde Appeal News) `गोपीनाथ मुंडे गेले तो आपल्याला न आवडणारा दिवस येतोय`, अशा शब्दात त्यांनी लोकांना आवाहन केले आहे.

या संदर्भात एक व्हिडिओ जारी करत त्यांनी ३ जून रोजी सकाळी ११ वाजता गोपीनाथ गडावर होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रम आणि महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, आपल्या न आवडणारा, नकोसा असा दिवस म्हणजे गोपीनाथ मुंडे गेले तो. ३ जून या दिवशी गोपीनाथ मुंडेसाहेब (Gopinath Munde) आपल्याला सोडून गेले, त्यामुळे हा दिवस आपल्याला नकोसा वाटतो.

पण या दिवशी त्यांची आठवण त्यांचे विचार, त्यांनी केलेले संस्कारावर वाटचाल करण्याचा संकल्प आपण करत असतो. (Beed News) मुंडेसाहेबांचे भक्त, चाहते म्हणून आपण त्यांच्या जाण्याच्या दिवसातून देखील प्रेरणा घेत असतो. त्यामुळे ३ जून रोजी सकाळी ११ वाजता सगळ्यांनी गोपीनाथ गडावर उपस्थीत राहावे, असे आवाहन मी करते.

गोपीनाथगडावर दर्शन आणि १ वाजता ह.भ.प.श्री.ढोक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. त्यामुळे मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी प्रथेप्रमाणे गोपीनाथ गडावर या, मी तुमची प्रतिक्षा करते, असे आवाहन देखील पंकजा यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT