Prakash Solanke Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde Controversy : गोपीनाथ मुंडेंनी राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडेंना नाही, तर...'; आमदार प्रकाश सोळंकेंचं मोठं विधान

Gopinath Munde Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी धनंजय मुंडेंकडे पाहिलं जात असल्याचं वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.या वादात आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उडी घेतली आहे.

Deepak Kulkarni

Beed News : मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यात गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा असल्याचं विधान केलं होतं. त्यांचे पुतणे धनंजय यांचाही राजकीय प्रवास काकांसारखाच संघर्षाचा राहिला आहे. गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडं पाहिलं जात असल्याचं वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.या वादात आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी उडी घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीका केली आहे. ते म्हणाले, आपला राजकीय वारस कोण असावा याचा निर्णय गोपीनाथ मुंडे यांनी 2008 सालीच घेतला होता. धनंजय मुंडे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पंकजा याच गोपीनाथ मुंडेच्या वारस निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. तसेच भुजबळांनी याबाबत त्यांचं मत नोंदवलं नसतं तर बरं झालं असतं असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंसह (Dhananjay Munde) पंकजा मुंडेंवरही निशाणा साधला.ते म्हणाले,आपण पाचव्यांदा निवडून आलो आहोत, आपल्या विजयाचे श्रेय धनंजय मुंडेंनी घेऊ नये.गेल्या 60 वर्षांपासून सोळंके कुटुंबीय राजकारणात असून त्यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांचा उगमही झाला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.

आमदार प्रकाश सोळंके यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर कडक शब्दांत पलटवार केला आहे. ते म्हणाले, 1995 मध्ये युतीचे पहिल्यांदा शासन आले. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते.1995 ते 2008 स्थानिक स्वराज्य संस्था,विधानसभा,लोकसभा अशा निवडणुका आम्ही सोबत लढवल्या आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मात्र, छगन भुजबळ यांनी आता दुर्दैवी वाद निर्माण केला आहे.पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार म्हणून निवडणुका लढवल्या असल्याचंही सोळंके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

प्रकाश सोळंके यांनी छगन भुजबळांवर शा‍ब्दिक हल्ला चढवला.ते म्हणाले,आमच्या पक्षाच्या शिस्तीत भुजबळांचं बोलणं कुठंही बसत नाही. त्यांचं मंत्रिमंडळात राहून सरकारच्या जीआरला विरोध करणं चुकीचं असून त्यांनी बाहेर पडून विरोध करावा असा चिमटाही सोळंके यांनी काढला. तसेच त्यांनी नाशिकमध्ये हजारो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा टोला लगावत भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात लक्ष द्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, एखाद्याच्या कुटुंबात जन्माला आला म्हणून वारस होत नाही. पण गोपीनाथ मुंडे हे खूप मोठं नेतृत्व होतं. आता बहीण-भाऊ एकत्र आले आहेत, त्यांनी यापुढे एकत्रित कसे राहता येईल, हे बघितले पाहिजे, असा खोचक टोलाही सोळंके यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT