औसा : "महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य व व महाराष्ट्रातील महापुरुषांचा आवमान करीत आहात. आम्हाला प्रश्न पडला आहे की, आपण राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल (governor)पदावर नियुक्त आहात की, महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी? आम्ही सर्वजण आपल्या प्रति प्रार्थना करतो की, आपल्याला जडलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) द्वेषाच्या आजारातून आपण लवकर बरे व्हाल`, अशी टीका करणारे तब्बल दोन हजार पत्र पाठविण्याची मोहीम राष्ट्रवादीने सुरू केली आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली (Ncp)राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या पत्राद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परवा मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परवा मुंबई, ठाण्यातून गुजराती व राजस्थानी लोक निघुन गेली तर या दोन्ही ठिकाणी पैसाच शिल्लक राहणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, अशी मुक्ताफळे उधळली होती.
त्याच बरोबर छत्रपती शिवराय, सावित्रीबाई, महात्मा फुले यांच्याबद्दलही पुर्वी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर वारंवार राज्यपालांकडून राज्यविरोधी वक्तव्य केली गेली. यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र द्वेषाचा आजार तर जडला नाही ना ? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. नेमका हाच प्रश्न उपस्थित करत राज्यपालांना पत्र पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसने घेतला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह अनेका नेत्यांनी राज्यपालांच्या या विधानाचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर या वक्तव्याचा निषेध म्हणून दोन हजार पत्र पोस्टाने पाठविण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यपालांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे त्यांना जडलेला महाराष्ट्र द्वेषाचा रोग असल्याचा आरोप यातून करण्यात आला आहे. या रोगातून ते लकरच बरे होतील, अशा खोचक शुभेच्छाही राज्यपालांना देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.