<div class="paragraphs"><p>Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar</p></div>

Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar

 

Sarkarnama

मराठवाडा

ग्रामपंचायत लढवण्याची लायकी नाही, अन् म्हणे भावी खासदार..

सरकारनामा ब्युरो

जालना : ज्यांची ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची लायकी नाही, ते भावी खासदार होण्याची स्वप्न पाहत आहेत, असा टोला काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर (shivsena) यांना नाव न घेता लगावला आहे. खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरात ठिकठिकाणी भावी खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत. (Jalna) या पोस्टरचा संदर्भ देत गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर निशाणा साधला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज जालना-हडपसर व किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार कैलास गोरंट्याल देखील उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी खोतकर यांच्यावर टीका करतांना त्यांचा भावी खासदार अशा पोस्टरवरील उल्लेखाची खिल्ली उडवली.

गोरंट्याल म्हणाले, मी गेली पंधरा वर्ष आमदार, राजेश टोपे मंत्री आहेत. लोणीकर मंत्री होते, आता आमदार आहेत. नारायण कुचे, संतोष दानवे आमदार तर खासदार रावसाहेब दानवे हे देखील आमदार, खासदार आणि केंद्रात मंत्री झाले. पण जालना शहरातील रस्त्यावर सध्या भावी खासदारांचे बोर्ड लागले आहेत.

या भावी खासदाराला वीस वर्षे मिळले, त्यात ते दहा वर्षे मंत्री होते, आम्ही जशी तीन काम दाखवतो, तशी त्यांनी तीन काम दाखवावित? असे आव्हान देत त्यांनी खोतकरांची खिल्ली उडवली. पंधरा वर्षे यांच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, साधं शेतकऱ्यांसाठी स्वछता गृह यांना बांधता आलं नाही, यांची ग्रामपंचयात निवडणूक लढण्याची लायकी नाही आणि हे भावी खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत, असा घणाघातही गोरंट्याल यांनी केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची देखील चौकशी झाली. यावरून देखील गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर टीका करत तुमची चर्चा देशभरात झाली असे, म्हणत चिमटा काढला होता. त्यानंतर आता पुन्हा गोरंट्याल यांनी खोतकरांचे नाव न घेता त्यांना टोला लगावल्याने जिल्ह्यात काॅंग्रेस विरुध्द शिवसेना असा संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT