Gram Panchayat Election, News
Gram Panchayat Election, News Sarkarnama
मराठवाडा

Gram panchayat election : बोगस मतदानाच्या आरोपावरून हाणामारी, दोघे जखमी..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. दुपारी दीडपर्यंत २२ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. Gram panchayat Election मतदान सुरळीत सुरु असतांना पैठण तालुक्यातील पाचोडजवळील गावात बोगस मतदानाच्या आरोपावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाल्याची माहिती आहे.

जखमीवर उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी गर्दी पांगवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेने शांततेत सुरू असलेल्या मतदानाला मात्र गालबोट लागले. (Paithan) पैठण तालुक्यातील सालवडगावातील मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा आरोप झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (Aurangabad) यातून मतदान केंद्रापासून काही अंतरावर दोन गटात हाणामारी झाली.

हा प्रकार सुरू असतांना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगवले. दरम्यान, या हाणामारीत दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र पंढरीनाथ ठोंबरे आणि विनोद रघुनाथ ठोंबरे असे जखमींची नावे असल्याचे समजते.

याप्रकरणी मारहाण झालेल्या गटाकडून रवींद्र ठोंबरे हा मतदान करून निघाला होता. याचवेळी विरोधी गटातील दहा ते पंधरा जणांनी त्याला अडवून मारहाण केली. यावेळी एकाने हातात दगड उचलून त्याच्या छातीवर मारला. ज्यात तो जखमी झाला असल्याचा आरोप करण्यात आला. बोगस मतदान केल्याचा आरोप करत ही मारहाण झाल्याचे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT