Beed District Grampanchayat Election News
Beed District Grampanchayat Election News Sarkarnama
मराठवाडा

Grampanchayt Election Result : शिवसेनेच्या मंत्र्यांची कन्या राष्ट्रवादीकडून सरपंच

दत्ता देशमुख

Beed News : शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय सख्य असले तरी शिवसेनेच्या मंत्र्यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आघाडीतून सरपंच झाली आहे. Grampanchayat Election दैठण (ता. गेवराई) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या गटाने बाजी मारली.

राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या प्रेरणा प्रतापसिंह पंडित यांनी सरपंचपदावर विजय मिळविला. (Beed News) त्यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव केला. (NCp) मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या प्रेरणा भुमरे -पंडित यांचे दैठण (ता. गेवराई) सासर आहे.

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चुलतबंधू संभाजीराव पंडित यांच्या त्या स्नुषा आहेत. दैठण हे माजी मंत्री बदामराव पंडित व राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे गाव आहे. ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अमरसिंह पंडित गटाचे वर्चस्व आहे. प्रतापसिंह पंडित यांनी देखील दैठणचे सरपंचपद भूषविलेले आहे.

दरम्यान, आता ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित व शिवसेनेचे बदामराव पंडित यांच्या गटांमध्ये लढत झाली. राष्ट्रवादीकडून प्रेरणा प्रतापसिंह पंडित तर शिवसेना गटाकडून शुभांगी निळकंठ पंडित सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. मातब्बर नेत्यांचे गाव असल्याने निवडणुक अटीतटीची झाली. निवडणुकीत अमरसिंह पंडित गटाच्या प्रेरणा पंडित यांच्यासह सर्व नऊ सदस्यही विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT