Gram Panchayat Election Results Sarkarnama
मराठवाडा

Gram Panchayat Election Results : शिरसाटांच्या मतदारसंघात विरोधकांचा गुलाल, सरपंचपदासह ग्रामपंचायत ताब्यात...

Jagdish Pansare

Marathwada Political News : शिंदे गटाचे आमदार तथा शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पहिल्या गोलवाडी गावात विरोधकांनी गुलाल उधळला. (Gram Panchayat Election Results) सरपंचपदासह सर्व सात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या गोलवाडी ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली.

आदर्श ग्रामविकास पॅनेलचा पराभव करत गोलवाडीची ग्रामपंचायत गायकवाड यांच्या पॅनेलने पुन्हा ताब्यात घेतली आहे. (Sanjay Shirsat) आमदार संजय शिरसाट यांनी या ग्रामपंचयात निवडणुकीत लक्ष घातले नसले तरी त्यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याच्या तयारीत असलेल्या रमेश गायकवाड यांच्या पॅनेलने मिळवलेला हा विजय मोठा समजला जात आहे.

पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागाचा मिळून आहे. (Shivsena) या मतदारसंघात ग्रामीण भागातील गोलवाडी हे पहिले गाव आहे जे शहरापासून अगदीच जवळ आहे. या (Gram Panchayat)ग्रामपंचायतीमध्ये आदर्श ग्रामविकास विरुद्ध गोलवाडी ग्रामविकास पॅनेल यांच्यात प्रमुख लढत होती. काल झालेल्या मतदानात ८० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

आज निकाल हाती आला तेव्हा सरपंचपदासह सर्व सात ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामविकास पॅनेलचे निवडून आले. निकाल घोषित झाल्यानंतर रमेश गायकवाड यांनी विजयी सरपंच, सदस्यांचे अभिनंदन करत जल्लोष केला. सरपंचपदी भारती रमेश कनीसे या विजयी झाल्या आहेत, तर बाबासाहेब धोंडू पाटील, सुनील किर्तीशाही, संगीता सातपुते, अंजली सलामबाद, प्रतीक्षा खोतकर मच्छिंद्र गिऱ्हे व दीक्षा सलामपुरे हे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडून आलेल्या सरपंच व सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही या वेळी दिली.

विद्यमान आमदार संजय शिरसाट यांनी या निवडणुकीत फारसे लक्ष घातले नसल्याचे बोलले जाते. आदर्श ग्रामविकास विरुद्ध गोलवाडी ग्रामविकास पॅनेलमध्येच प्रामुख्याने ही लढत होती. यात ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली. दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या पैठण मतदारसंघातील वडवाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर आपल्या समर्थक महिला उमेदवाराला निवडून आणले. जिल्हा दूध संघातील भुमरे यांचे कट्टर समर्थक नंदलाल काळे यांच्या पत्नी स्वाती काळे यांनी ठाकरे गटाच्या प्रतिभा खोपडे यांचा पराभव केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT