Gram Panchayat Election News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Gram panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीत झाले लक्ष्मी दर्शन; व्हायरल व्हिडिओने खळबळ

Vaijapur : व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे आदेश आचारसंहिता पथकाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : निवडणुका म्हटलं की वारेमाप पैशाची उधळण असे जणू समीकरणच बनले आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवणावळी आणि मतदारांना पैशाचे वाटप असा आरोप प्रत्येक निवडणुकीत केला जातो. Gram Panchayat Election आज राज्यातील साडेसात हजाराहून अधिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले.

काही ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारी तर काही ठिकाणी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदानच होऊ नये म्हणून चक्क ईव्हीएम मशीनच्या बटनावर फेविक्विक टाकण्याचा प्रकारही उघडकीस आला. (Aurangabad) या सगळ्यांमध्ये चर्चा होत आहे ती वैजापूर तालुक्यातील तिडी गावात मतदारांना पैसे वाटप केले जात (Marathwada) असल्याच्या सोशल मीडियावरील एका व्हिडिओची.

मतदान सुरू झाल्यानंतर काही तासातच व्हायरल झाला हा व्हिडिओ वैजापूर तालुक्यातील तिडी गावातील असल्याचा दावा केला जातो आहे. यामध्ये एक माजी सरपंच मतदानासाठी पैसे वाटप करत असल्याचे दिसत आहे.

वैजापूर तालुक्यामध्ये २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. दरम्यान पैसे वाटपाच्या व्हायरल व्हिडिओमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. बरं हा व्हिडिओ खरा आहे की खोटा? यासंदर्भात कुणीही पुष्टी केलेली नाही. तहसीलदार राहुल गायकवाड यांनी या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे आदेश संबंधित विभागातील आचारसंहिता भंग पथकाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

व्हिडिओमध्ये तथ्य आढळल्यास चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे, आश्वासन दिले आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT