Paithan Grampanchayat Result News
Paithan Grampanchayat Result News Sarkarnama
मराठवाडा

Gram Panchayat Result : मंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News : जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये शिंदे गटाने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे. Gram Panchayat Result असे असले तरी राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन, आडुळ ग्रामपंचायतीमध्ये उद्धवसेनेचे सरपंच विजयी झाले आहेत.

आडुळ, बिडकीन ही भुमरे यांच्या दृष्टीने महत्वाची गावे समजली जातात. याच ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचे सरपंच निवडून आल्याने भुमरेंना हा धक्का मानला जातोय. (Paithan) विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरानंतर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भुमरेंच्या मतदारसंघातील याच बिडकीनमध्ये येवून शिवसंवाद यात्रा आणि सभा घेतली होती. (Shivsena)

त्यावेळी सभेला झालेल्या गर्दीची जोरदार चर्चा झाली होती. आता थेट जनतेतून निवड झालेल्या सरपंच पदावर आडुळ आणि बिडकीन येथे ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी झाले आहेत. बिडकीनमध्ये भुमरे यांच्या गटाचा सरपंच पदाचा उमेदवार बबन ठाणगे तिसऱ्या क्रमांकावर होता.

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा धक्का म्हणावा लागेल.

बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भुमरे यांच्यावर झाला होता. यावर मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असे म्हणत भुमरेंनी आरोप फेटाळले होते. याच बिडकीनच्या सरपचंपदाच्या निवडणुकीत भुमरेंच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT