Lautr News : जिल्ह्यातील साडेतीनशे ग्रामपंचायतींपैकी १५३ ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. भाजप दीडशेपार झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काॅंग्रेस शतकाकडे वाटचाल करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. Grampanchayat Election विद्यमान आमदारांनी आपापल्या मतदारसंघात व काही प्रमाणात जिल्ह्यात वर्चस्व दाखवले आहे. तर माजी आमदारांना मात्र धक्का सहन करावा लागला आहे.
सायंकाळपर्यंतच्या निकालानूसार जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायतींवर भाजप, तर काँग्रेसला ७३ ठिकाणी यश मिळाले आहे. (Latur News) माजी आमदार दिनकर माने, आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. (Bjp) आमदार बाबासाहेब पाटील यांनी गावात वर्चस्व राखले.
तर मलकापूर ग्रामपंचायतीवरील काँग्रेसच्या सत्तेला आमदार संजय बनसोडे यांनी सुरुंग लावला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला केवळ १६ ग्रामपंचायती जिंकता आल्या आहेत. शिंदे गटाने तीन ग्रामपंचायती जिंकत ग्रामीण भागात चंचू प्रवेश केला आहे.
लातूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून इथे त्यांना शिंदे गटाचा फारसा फायदा झालेला नाही. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मर्यादित असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गटाला मर्यादित यश मिळाल्याचे पहायला मिळाले. ठाकरे गट १३ ग्रामपंचयातीत चमक दाखवू शकला. तर शिंदे गटाने तीन ग्रामपंचायती जिंकत ग्रामीण भागात सुरुवात केली असेच म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.