Raosaheb Danve Reaction News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Gujrat Election : जनतेने मोदींच्या विकासकामांवर विश्वास दाखवत कमळ फुलवले..

Bjp Maharashtra : गुजरात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन दानवे यांनी केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Raosaheb Danve Congratulate News : गुजरात विधानसभा निवडणुकीत सलग सातव्यांदा भाजपने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. Gujrat त्यानंतर आता देशभरातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गुजरातच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर आणि विकासकामांवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा कळम फुलवले, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Bjp) गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते.

काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि त्याला मिळत असलेला अभुतपूर्व प्रतिसाद, आम आदमी पक्षाची गुजरातमध्ये एन्ट्री यामुळे ही निवडणुक रंगली होती. परंतु मोदी यांच्या जादूपुढे काॅंग्रेस, आम आदमी फिके पडले. १५८ जागा जिंकत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास रचला.

या विजयानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यासह गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. भाजप आणि मोदीजींच्या लोककल्याणकारी धोरणांवर आणि विकासकामांवर विश्वास दाखवत गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने राज्यात कमळ फुलवले आहे.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, गृहमंत्री श्री. शाह यांचे मार्गदर्शन आणि जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत भाई पाटील आणि गुजरात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन दानवे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT