AD. Gunratna Sadavrtee Visit ST Reservation Protest In Jalna News Sarkarnama
मराठवाडा

Gunratna Sadavarte : जालन्यात गाडीवर हल्ला, तरी गुणरत्न सदावर्तेंचे धनगर आरक्षणासाठी 'डंके की चोट पे' भाषण

Gunratna Sadavrte Visit ST Reservation Protest In Jalna : मी रस्त्याने मेढ्यां चारायला जाणारं कुटुंब माझ्या पाच वर्षाच्या मुलीला दाखवलं. आम्ही आदिवासी आहोत, त्याचा हा पुरावा आहे.

Jagdish Pansare

  1. जालना येथे गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतरही अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी ठाम आणि आक्रमक भाषण केले.

  2. आरक्षणासाठी उपोषण सुरू केलेल्या दीपक बोऱ्हाडेंची सदावर्तेंनी सहकुटुंब भेट घेतली.

  3. या भेटीमुळे आंदोलनाला नव्या उर्जेसह राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले.

Protest For ST Reservation : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करा, या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांची अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सहकुटुंब येऊन भेट घेतली. दीपक बोऱ्हाडे हा माझा भाऊ धनगर भावांना एसटीचे आरक्षण मिळावे म्हणून उपास करतो आहे, सरकारने त्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी. नुसतं येऊ नका, तर अॅक्ट घेऊन या, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी उपोषणाच्या व्यासपीठावरून केली.

जालन्यातील अंबड चौफुली येथे नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आज जालन्यात आले होते. दरम्यान, शहरातील एका पेट्रोल पंपासमोर गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. चार-पाच आंदोलकांनी गाडीच्या काचावर हाताने मारत सदावर्ते यांना विरोध दर्शवला. त्यानंतरही सदावर्ते यांनी धनगरांना एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली.

यावेळी केलेल्या भाषणात सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत, धनगर समाजाच्या मागण्या कशा योग्य आहेत? हे सांगीतले. धनगर आरक्षण (ST Reservation) मिळालंच पाहिजे, यळकोट यळकोट जय मल्हार! माँ अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, अशा घोषणा देत आपण 'डंके की चोटपर' बोलणारच म्हणत धनगर भावांना एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचे कौतुक केले. आंदोलनं अनेक होतात, पण चर्चा नियतीत खोट नसते त्या आंदोलनाचीच होते.

आपण कायद्यावर बोलतो, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, भारतीय संविधानाचे विचार सारखेच आहेत. आता येताना गाडीवर काही लोक आले, माझी 80 वर्षाची आई तुमच्या भेटीला आली आहे. भावांनो, मला तुम्हाला सागायंचय, आपण संविधानाला जोडलेले आहोत, हम धनगर है. नागेवाडीच्या पुढे आलो तेव्हा, मी रस्त्याने मेढ्यां चारायला जाणारं कुटुंब माझ्या पाच वर्षाच्या मुलीला दाखवलं. आम्ही आदिवासी आहोत, त्याचा हा पुरावा आहे. सरकार माझ ऐकतं, अनेकांना माझं ऐकावंच लागतं, असही सदावर्ते म्हणाले.

धनगरांचे मागासलेपण तपासण्याची गरज नाही..

हम धनगर है, हम क्रिमिनल ट्राईब है, इंग्रजाच्या काळात जे समुदाय आदिवासी होते त्यांना अठराशे शतकात क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं. त्या ट्राईब्सला देशात काश्मीरपासून कन्याकुमार पर्यंत शेड्युल ट्राईब संबोधल गेल. त्यामुळे धनगर एसटी है. आमच्याकडे गाड्या आल्या, चांगले कपडे घालू लागलो तर म्हणे धनगर मागास कसे? सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे एक निकाल दिला आहे. त्यात स्पष्टपणे लिहलंय, अनुसूचित जाती, जमातीत जे येतात त्यांच मागासलेपण तपासण्याची गरज नाही. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने, सांगीतलंय. म्हणून डंके की चोट पर धनगर एसटी है, असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

तुमचं आमचं नात रक्ताचं आहे. आमच्या भाषेचा राग येत असेल तर एसटीचं आरक्षण देऊन टाका, आमचे मागासलेपण दूर होईल. माझा धंदा रेतीचा नाही, मी टिप्परवाला नाही, मी कोणाला चपटी पाजत नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता सदावर्ते यांनी लगावला. तर लक्ष्मण हाके, गोपीचंद पाडळकरांचा उल्लेख ते माझे भाऊ आहेत, असा केला. दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सुरू आहे, ही लढाई न्यायालयात आणि रस्त्यावरही लढावी लागेल. मागास आयोगाचा रिपोर्ट लागतो असे सांगतील, त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला द्या. तुम्हाला एका शपथपत्रावर जात प्रमाणपत्र द्यावे लागेल, सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे, मी तुमच्यासोबत जात प्रमाणपत्रासाठी येईल, अशी ग्वाही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी दिली.

नुसतं येऊ नका, अॅक्ट घेऊन या..

ही जागा राजकीय नाही, संजय शिरसाट, बावनकुळेसाहेब, गिरीश महाजन दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तातडीने यंत्रणा हलवा, येताना नुसतं येऊ नका, वादा नको, अॅक्ट घेऊन या. डंके की चोट पर प्रमाणपत्र मिळतील, कायदा कोणी हातात घेऊ नका, सुप्रीम कोर्ट , संविधान आपल्यासोबत आहे. सरकारलाही आपल्यापासून दूर जाता येणार नाही.

येणाऱ्या काळात धनगर समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी महायुती सरकार काम करेल, असा विश्वासही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी उपस्थितांना दिला. देवेंद्र फडणवीस माझ्या बोराडे भावाला वाचवा. सगळ्या राजकारण्यांनो धनगर से पंगा भारी पडता है.. सरकारने लवकर यावं, गिरीश महाजन लवकर या, माझा भाऊ उपाशी आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,सगळ्यां राजकारण्यांनी दखल घ्यावी, असे आवाहनही सदावर्ते यांनी भाषणाच्या शेवटी केले.

FAQs

प्र.1. जालना येथे काय घटना घडली?
सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला झाला, मात्र त्यांनी धाडसी भाषण केले.

प्र.2. दीपक बोऱ्हाडे कोण आहेत?
ते एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले कार्यकर्ते आहेत.

प्र.3. सदावर्तेंनी बोऱ्हाडेंची भेट का घेतली?
आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी.

प्र.4. हल्ल्यानंतर सदावर्तेंची भूमिका काय होती?
त्यांनी आक्रमक भाषण करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

प्र.5. या घटनेचा आंदोलनावर काय परिणाम होणार?
या घटनेने आंदोलनाला नवा जोर मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT