Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav News : मोदींच्या विकासाचे माॅडेल मार्केटिंगचे, तर केसीआरांचे प्रत्यक्षातले..

सरकारनामा ब्युरो

Nanded : तेलंगणासारख्या छोट्या राज्यात शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामातील बियाणांसाठी पाच हजार रुपये, चोवीस तास मोफत वीज आणि उत्पादित मालाची हमी भावाने खरेदी हे खरे विकासाचे माॅडेल आहे. केसीआरांचे माॅडेल हे प्रत्यक्षात आहे, तर मोदींच्या विकासाचे माॅडेल हे मार्केटिंगचे असल्याची टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी केली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची लोहा येथील बैलबाजार मैदानात जाहीर सभा झाली. (Nanded) यावेळी बोलतांना हर्षवर्धन जाधव यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, शरद पवार यांच्यासह राज्यातील नेत्यांवर देखील टीका केली. (Marathwada) उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आॅडिओ क्लीप आपण ऐकली असेल, माझा तो शेवटचा प्रयत्न होता, असेही त्यांनी जाहीर सभेतील भाषणात सांगितले.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, शरद पवार, अजित पवार यांच्या महागड्या गाड्या सहा महिन्याला बदलतील, अशोक चव्हाणांचा मलबारहिलला आणखी एक बंगला होईल, पण तुमच्या पायतली फाटकी चप्पल बदलणार नाही. ती बदलायची असेल, गाडीत फिरायचे असेल तर बीआरएस पक्षाचा पर्याय स्वीकारा, सभासद व्हा.

तेलंगणासारख्या छोट्या राज्याचे बजेट दोन लाख कोटींच्यावर जावू शकते तर महाराष्ट्राचे १० ते १२ लाख कोटींवर निश्चितच जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेल्या पक्षाची आपण साथ द्यायला हवी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये केसीआर यांची सभा घेण्याचे नियोजन आहे. या संदर्भात माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी परवानगी दिल्यानंतर पुढील नियोजन तारीख ठरेल, असेही जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT