Health Department News
Health Department News Sarkarnama
मराठवाडा

Health Department News : आरोग्य विभागात `मुन्नाभाई`, वैद्यकीय शिक्षण नसतांना आरोग्य अधिकारी म्हणून करत होता काम..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : कोणतेही वैद्यकीय शिक्षण,(Medical Education) पदवी न घेता एक नव्हे तर तब्बल पाच वर्ष तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मुन्नाभाईचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हा बनाव उघडकीस आला आहे.

कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना तब्बल पाच वर्षे आरोग्य विभागात (Health Department) एक तरुण तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होता. पदवी नाही, वैद्यकीय शिक्षण नाही तरी तो रुग्णांची तपासणी करून उपचारही करत होता. (Fir Filed) आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा तोतया डॉक्टर असल्याच समोर आले. मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे.

त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathwada) अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली. मोहसिन खान हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याची कंत्राटी पद्धतीने दोन वेळा नियुक्ती झाली.

पहिली नियुक्ती २०१९ मध्ये, तर दुसरी नियुक्ती २०२२ मध्ये झाली. गेली पाच वर्षे तो कार्यरत होता. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 'बीएएमएस' उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. त्यासाठी मोहसिन खान याने तसे पदवीचे प्रमाणपत्रही सादर केले. मात्र, तपासणीत ते प्रमाणपत्रच बनावट असल्याचे सिद्ध झाले. सिटीचौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी उपनिरीक्षक उद्धव हाके त्याच्या शोधासाठी रवाना झाले.

त्याच्या मूळ गावीदेखील शोध घेतला. परंतु आपला बनाव उघडकीस आल्याचे कळताच तो पसार झाला. त्याचा शोध सुरू असून लवकरच अटक केली जाईल, असे हाके यांनी सांगितले. मात्र, ५ वर्षे एका तोतया डॉक्टरने प्रशासनाच्या सेवेत आरोग्य अधिकारी म्हणून काम केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT