High Court On Hospital News Sarkarnama
मराठवाडा

High Court On Hospital : घाटी रुग्णालयातील दुरवस्थेवर मंगळवारी सुनावणी; संयुक्त पथकाने केली पाहणी...

Imtiaz Jaleel News : दोन वाजता सरकारी वकील ॲड. सुजीत कार्लेकर, खासदार इम्तियाज जलील यांच्या पथकाने घाटी रुग्णालयाची पाहणी केली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : आरोग्य यंत्रणा व रुग्णालयातील सुविधा, परिचारिकांच्या नियुक्त्या औषधांचा तुटवडा यासंदर्भात दाखल जनहित याचिकेत शनिवारी (ता. सात) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (High Court News) न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि वाय.जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान घाटी रुग्णालयातील अस्वच्छतेसंदर्भात मुद्दा चर्चेला आला असता सरकारी वकील आणि याचिकाकर्ता यांनी संयुक्तपणे पाहणी करून मंगळवार (ता. दहा) फोटोसह अहवाल सादर करण्याचे तोंडी निर्देश दिले.

त्यानुसार या समितीने घाटी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. (AIMIM) घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीत ७५ परिचारिकांच्या भरतीबाबत खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर सरकारी वकील कार्लेकर यांनी एमपीएससीने परीक्षा घेतलेली असून, त्याचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांच्या छाननीसाठी आणखी ४ ते ६ आठवडे लागतील, असे निवेदन न्यायालयात केले.

त्यावर खंडपीठाने कागदपत्रांची छाननी २७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी आणि निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान कराव्यात असे निर्देश दिले. (Marathwada) जलील यांनी औषधांच्या नियमित पुरवठा व साठ्याबाबत आणि घाटीमध्ये गेल्या १२ वर्षांपासून नियमित वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती नसल्याचे आणि कायमस्वरूपी आरएमओंचीही नियुक्ती केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यावर सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी याबाबत माहिती घेण्यासाठी वेळ मागितला असता १० ऑक्टोबरपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्युमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली असल्याने त्यावर बोलणे उचित नसल्याचे खंडपीठाने सांगितले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर तातडीने दुपारी दोन वाजता सरकारी वकील ॲड. सुजित कार्लेकर, खासदार इम्तियाज जलील यांच्या पथकाने घाटी रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता व इतर सर्व डॉक्टर, अधिकारी तसेच ॲड. सुनील जाधव, ॲड. प्रसाद जरारे उपस्थित होते. दरम्यान, गरीब रुग्णांसाठी जो मी लढा देत आहे, आरोग्य यंत्रणा मजबूत झाली पाहिजे, रिक्त पदे भरली पाहिजे, निष्पाप रुग्णांना जीव गमवायची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT