औरंगाबाद : माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेला गौफ्यस्फोट आणि दावे-प्रतिदावे यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) १५ आमदारांसह काॅंग्रेसमध्ये जाणार होते, याला दुजोरा देखील दिला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत यांनी याची पुष्टी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी देखील चव्हाणांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिंदे हे १५ आमदार घेऊन काॅंग्रेसकडे आले होते,असा आरोप केला आहे. मग ते इतके दिवस गप्प का होते? सत्ता असतांना त्यांना हा गौप्यस्फोट का करावासा वाटला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढती लोकप्रियता पाहता त्यांची प्रतिमा करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. माजी मंत्री व काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला.
ते म्हणाले, राज्यात शिवसेना-भाजप युती असतांना एकनाथ शिंदे काही आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन काॅंग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी आघाडीचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा आरोप केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि उद्धव सेनेच्या नेत्यांनी या संधीचा फायदा उठवत शिंदे यांच्या मनात आधापासूनच पाप होते, त्यांनी यापुर्वीच गद्दारी करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणत हल्ला चढवला.
त्यानंतर आता शिंदे सेनेचे नेते देखील या आरोपाचे खंडण करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. हिंगोलीचे शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत पाटील यांनी जालना येथे बोलतांना अशोक चव्हाण यांच्या या आरोपाबद्दल शंका उपस्थितीत केली. पाटील म्हणाले, अशोक चव्हाण हा आरोप करण्यासाठी इतके दिवस का थांबले. सत्ता असतांना त्यांनी याचा गौप्यस्फोट का केला नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कमी वेळात राज्यातील जनतेच्या मनात आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. वीस वीस तास काम करून ते वेगाने निर्णय घेऊन राज्यातील जनतेची सेवा करत आहेत. त्यांची वाढती लोकप्रियता हीच खरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पोटदुखी आहे. यातूनच मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी चव्हाण यांनी हा आरोप केला आहे, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.