Aurangabad : पोलिसांच्या मॉक ड्रिलमध्ये मुस्लिमद्वेष अर्थात दहशतवादी म्हणून दाखवण्याच्या विरोध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान न्या. मंगेश एस. पाटील, न्या. एस. जी. चपळगावकर यांनी गृह मंत्रालय आणि पोलिस महासंचालक व प्रतिवादींना नोटीस बाजावली असून, खबरदारी म्हणून पुढील सुनावणीपर्यंत मॉक ड्रीलमध्ये विशेष समुदायातील संबंधीत व्यक्तीला दहशतवादी म्हणून दाखवू नये असे निर्देश दिले आहेत.
पोलिसांतर्फे मॉक ड्रील केले जाते, मात्र काही दिवसापुर्वी नगर आणि चंद्रपूर पोलिसांनी दहशतवादी म्हणून मुस्लिम व्यक्ती दाखवला. (High Court) विशेष म्हणजे हा व्यक्ती धार्मिक घोषणा देत होता. हा व्हिडीओ समाजमाध्यमांध्ये व्हायरल झाला होता. (Aurangabad) यातून अतिरेकी हा मुस्लिम समाजाचाच असतो हा गैरसमज लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी जाणून बुजून दाखवले गेले असा आरोप करत सामाजीक कार्यकर्ते सय्यद औसामा अब्दुल कदीर यांनी ही ॲड सय्यद तौसिफ यासीन, ॲड मोहम्मद आसीम यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
पोलिसांचे मुस्लिम द्वेश व मुस्लिम समाजाविरुद्ध पक्षपातीपणा दर्शवते आणि दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा संदेश जातो. पोलिसांचे हे बेकायदेशी कृत्य एखाद्या व्यक्तीला सन्मानाने जगणाऱ्याचे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करते तसेच देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करणारा आहे. मुस्लिम समाजाच्या विश्वासाला तडा जातो असे याचिकेत नमुद केले आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने गृह मंत्रालय आणि पोलिस महासंचालक व प्रतिवादींना नोटीस बाजावली असून, खबरदारी म्हणून पुढील सुनावणीपर्यंत विशेष समुदायातील संबंधीत व्यक्तीला दहशतवादी म्हणून चित्रण मॉक ड्रीलमध्ये दाखवू नये असे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सय्यद तौसिफ यासीन, ॲड. मोहम्मद आसीम तर शासनातर्फे ॲड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.