Marathwada News : परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत अंतिम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी दिले.परभणीतील संविधान प्रतिकृती भंग केल्यानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यांच्यातर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज मंगळवारी (ता.29) युक्तिवाद केला. ॲड. आंबेडकर यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना 179 कलमान्वये नोटिसा पाठवून काय बोलले पाहिजे?
याविषयी चौकशीत नमूद केले होते. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष नाही, त्यांच्या कामकाजावर स्थगिती आणावी. नोटिशीतील मजकूर दिशाभूल करणारा आहे. (Aurangabad High Court) या प्रकरणातील प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) हा पोलिसांवरच दाखल झाला पाहिजे. शिवाय विशेष तपास समिती नियुक्त झाली पाहिजे. न्यायदंडाधिकारी यांच्यापुढील चौकशी अहवाल आहे त्यावर काय करायचे, याची कायद्यात तरतूद नाही.
त्यामुळे तशी तरतूद झाली पाहिजे, असे ॲड. आंबेडकर यांनी बाजू मांडताना सांगीतले. सरकार पक्षाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तीवाद केला. मुळ गुन्ह्यात सोमनाथ हा आरोपी आहे, आणि तो गुन्हा व मृत्यू प्रकरणाची सुनावणी ही वेगळी आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा तुरुंग अधिकाऱ्यांच्या पत्रावरून कलम 194 भारतीय न्यास संहिता अन्वये अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हा कोठडीतील मृत्यू असल्यामुळे राज्य सरकारच्या परिपत्रकमध्ये दिलेल्या निर्देशानुसार त्याचा तपास स्थानिक पोलिसांकडे न देता राज्य गुन्हे अन्वेषनकडे (सीआयडी) देण्यात आलेला आहे. या अनैसर्गिक मृत्यू संदर्भात 180 साक्षीदारांना कलम 179 प्रमाणे नोटीस देऊन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. या संदर्भाने करण्यात आलेली चौकशी पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी 8 मे रोजी ठेवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.