March For Support Name Change News Sarkarnama
मराठवाडा

March For Name Change Support News : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थानात १९ रोजी `हिंदू जन गर्जना`, मोर्चा..

Marathwada : हिंदू जन गर्जना करत हा मोर्चा निघाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गिरधर पांडे यांनी दिली.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajiagar : छत्रपती संभाजीनगर विरुद्ध औरंगाबादच्या समर्थनात शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन, मोर्चे काढण्याची तयारी सुरू आहे. (Aimim) एमआयएमच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १२ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या शिवाय घरोघरी जावून नामांतराच्या विरोधासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत.

तर दुसरकीडे शिवसेना, मनसे या पक्षांनी देखील छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ नागरिकांकडून पत्र लिहून घेण्याची मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. (MNS) मनसेने स्वप्नपुर्ती रॅली काढण्याची घोषणा केल्यानंतर आता सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या १९ मार्च गुरूवार रोजी शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे.

हिंदू जन गर्जना करत हा मोर्चा निघाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गिरधर पांडे यांनी दिली आहे. रविवारी सकाळी दहा वाजता शहरातील क्रांती चौकातून हिंदू जन गर्जना मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चासाठी जिल्हाभरातून हिंदू नागरीक सहभागी होण्यासाठी येणार आहेत.

हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांच्या पुढाकाराने आयोजित हिंदू जन गर्जना मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगरात विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांची बैठक नुकतीच पार पडली. मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज करण्यात येणार आहे. हिंदू जन गर्जना मोर्चाला पोलीस परवानगी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या स्वप्नपुर्ती रॅलीला अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यात हिंदू जन गर्जना मोर्चाला पोलिस परवानगी देणार का? हा खरा प्रश्न आहे. एमआयएमच्या कॅन्डल मार्चला परवानगी नसतांना हजारोंच्या संख्येत हा मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांसह दीड हजार जणांवर गुन्हे दाखल केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT