Narayan Rane- fadanvis-Patil
Narayan Rane- fadanvis-Patil Sarkarnama
मराठवाडा

Hingoli : सगळे पक्ष फिरून माजी खासदार पुन्हा भाजपमध्ये ; राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश..

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप परत शिवसेना आणि आता पुन्हा भाजप अशा सगळ्या पक्षांचा अनुभव घेतलेले हिंगोलीचे (Hingoli) माजी खासदार अँड. शिवाजी माने यांनी सोमवारी (ता.२५) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपाचे (Bjp) कमळ हाती घेतले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकूते, हिंगोली विधानसभा आमदार तान्हाजी मुटकुळे आदींची उपस्थिती होती. (Marathwada)

शिवाजी माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला सोमवारी पुर्ण विराम मिळाला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माने यांचा अधिकृतपणे पक्षात प्रवेश झाला. शिवाजी माने हे १९९६ मध्ये शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. १९९८ मध्ये परत लोकसभा निवडणूक झाली यामध्ये त्यांचा पराभव झाला.

नंतर १९९९ च्या निवडणुकीत ते परत शिवसेनेकडून निवडून आले होते. तर २००४ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान शिवाजी माने यांनी कळमनुरी मतदार संघात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते काही काळ अध्यक्ष देखील होते.

पण तिथेही ते फारकाळा टिकले नाही, त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर भाजपा, पुन्हा शिवसेना आणि आता परत भाजप असा त्याचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने हिंगोलीत भाजपची ताकद वाढेल असा दावा केला जात आहे. माने हे नारायण राणे समर्थक म्हणून ओळखले जातात.

मध्यंतरी शिवसेना विरुद्ध राणे असा वाद सुरू होता, तेव्हा माने यांनी या वादात उडी घेत एक व्हिडिओ जारी केला होता. यात राणे यांनी मातोश्रीवर आणि शिवसेनेच्या नेत्यांनी देखील राणे यांच्यावर टिका करू नये, शिवसेना मोठी करण्यात राणेंचा सिहांचा वाटा असल्याचे म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT