Mp Hemant Patil-Uddhav Thackeray News, Hingoli Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Political News: उद्धव ठाकरेंची तोफ हिंगोलीत धडाडणार ! बांगर-पाटलांना धोबीपछाड देण्याचा निर्धार..

Shivsena UBT Group: काॅंग्रेसकडून हिंगोली लोकसभा लढवण्याची जोरदार तयारी सुरू असतांना ठाकरेंच्या सभेने त्याला छेद देण्याचा प्रयत्न.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देणारे हिंगोलीचे खासदार हेमंमत पाटील आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना धोबीपछाड देण्याचा निर्धार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या दोन्ही गद्दारांना धूळ चारण्याचा निर्धार करत उद्धव ठाकरे येत्या २७ आॅगस्ट रोजी हिंगोलीत सभा घेणार असल्याची माहिती आहे.

यापुर्वीच ठाकरे यांचा हिंगोली (Hingoli) दौरा ठरला होता, परंतु काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला होता. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यादांच हिंगोलीत येत असल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २७ रोजीच्या जाहीर सभेतून ते खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्यावर कशी तोफ डागतात? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष असणार आहे.

मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघावर अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात काॅंग्रेने दावा सांगितला होता. (Shivsena) हिंगोली लोकसभेची जागा निवडून आणण्याचा निर्धार देखील चव्हाण यांनी बोलून दाखवला होता. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या, राष्ट्रवादीत फूट पडली. त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेच्या जागा वाटपाचा आढावा सगळ्याच राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे.

शिवसेनेने देखील राज्यातील सर्वच ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या हिंगोली दौऱ्याला महत्व आले आहे. हेमंत पाटील हे २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून आले होते, आता ते शिंदे गटात आहे. पाटील यांना गद्दारीचा धडा शिकवण्याचा निर्धार आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी ठाकरेंचा हिंगोली दौरा असल्याचे बोलले जाते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दुरध्वनीवरून हिंगोलीतील शिवसैनिकांशी संवाद साधला होता. मी तुमच्या भेटीला येईन असा शब्द देखील त्यांनी दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते हिंगोलीत येत आहेत. याच जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेशी शेवटच्या क्षणी गद्दारी केली होती. त्यामुळे बांगर यांचा समाचार उद्धव ठाकरे कसा घेतात ? याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काॅंग्रेसकडून हिंगोली लोकसभा लढवण्याची जोरदार तयारी सुरू असतांना ठाकरेंच्या सभेने त्याला छेद देण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT