subhash Desai

 

sarkarnama

मराठवाडा

सुभाष देसाईंचे मोठं विधान : मुंबईप्रमाणे इतर शहरांतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी?

मुंबईप्रमाणे करमाफीची सवलत ही हळूहळू संपूर्ण राज्याला मिळायला लागेल.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुंबईप्रमाणे राज्यातील इतर शहरांमधील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा आमचा विचार सुरू आहे, असे सूतोवाच राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना (shivsena) उपनेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केले आहे. (Houses up to 500 square feet in other cities in the state will be tax exempt : Subhash Desai)

उद्योगमंत्री सुभाष देसाई हे सोमवारी (ता. ३ जानेवारी) औरंगाबादमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईप्रमाणे करमाफीची सवलत ही हळूहळू संपूर्ण राज्याला मिळायला लागेल. ही सुरुवात झाली असून मुंबईने दिशा दाखवली आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरामंध्येसुद्धा ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ही सवलत कशी मिळेल, यावर आम्ही सर्वमंडळी विचार करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची घोषणा १ जानेवारी रोजी केली हेाती. तसेच या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली होती. या निर्णयाचा मुंबईतील साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ हाेणार आहे.

मुंबईप्रमाणेच उपराजधानी नागपूरमधील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा कर माफ करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केली होती. राजधानीला जो न्याय दिला, तोच न्याय उपराजधानी नागपूरला मुख्यमंत्री का लागू करत नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मुंबईमधील अल्प मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे, ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा, असंही देशमुख यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र मालमत्ता करमाफीची आठवण ठाकरे सरकारला एवढ्या उशिरा का झाली, असा सवाल विचारला आहे. गेल्या चार वर्षांत मालमत्ता कर माफ का केला नाही. ठाकरे सरकारचे मुंबईकरांवरचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे. आपण चार वर्षांपूर्वी मुंबईकरांना मालमत्ता करात माफ देण्याचे जाहीर केले होते, त्यावेळेपासून ही करमाफी द्यावी. गेल्या चार वर्षांत जो मालमत्ता कर वसूल केला, तो मुंबईकरांना परत द्या, अशी मागणीही शेलार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT