Rahul Gandhi
Rahul Gandhi  
मराठवाडा

'भाजपवाले असे कसे देश भक्त?'

सरकारनामा ब्युरो

दयानंद माने

Bharat Jodo Yatra देगलूर : आजच्याच दिवशी सहा वर्षापूर्वी पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता.नोटबंदीचा निर्णय हा काळा पैसा नष्ट करण्यासाठी नव्हता, तर तो छोट्या व्यापारांवर, शेतकऱ्यांवर झालेला हल्ला होता. त्याचा परिणाम आजपार्यंत देशातील प्रत्येक गरीबाला दिसत आहे. या निर्णयाने जनतेचे नुकसान झाले. हा निर्णय केवळ काही दोन-तीन उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी घेण्यात आला होता. नोटबंदीनंतर चुकीच्या पद्धतीने जीसटी लागू करण्यात आला, आणि त्याचाच परिणाम आज आपण भोगत आहोत, या दोन्ही निर्णयामुळेच देशाचा कणा उद्धवस्त झाला आहे." अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधाला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात आहे. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेची सांगता भोपाळा येथे झाली. उपस्थितांना संबोधताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी सहा वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी केला. यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं.

राहुल गांधी म्हणाले, भाजप वाले असे कसे देश भक्त? असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, एका भावाला दुसऱ्या भावाशी भांडायला लावणारे, एका भाषेच्या लोकांना दुसऱ्या भाषेतील लोकांसोबत भांडायला लावणारे, एका जातीच्या लोकांना दुसऱ्या जातीशी लढायला लावत आहेत. ज्या देशात एक धर्म दुसऱ्या धर्माशी लढत तर मग आपण कोणत्या देशाचे भक्त आहोत." अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला.

काल दिवसभरात काय झाले ?

महाराष्ट्रातील पदयात्रेचा हा पहिला दिवस असल्याने राज्य व देशभरातून आलेल्या लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आज सकाळी त्यांच्या पदयात्रेची सुरुवातच या गुरुद्वारापासून झाली. देगलूर जवळील वन्नाळी गावी गुरुद्वारात गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून अरदास (प्रार्थना)केली. देशभरात भाजप प्रणित बहुसंख्याक राजकारणाला प्राधान्य दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा संदेश महत्वाचा होता. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक गावकरी यांनी ई गर्दी केली होती. वन्नाळीचा तळ कार्यकर्त्यांच्या घोषणा, गाणी, व्हीआयपींचे आगमन व डीजेचा दणदणाट यांनी दुमदुमून गेला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांशिवाय अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्ते, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासकांनीही या यात्रेला हजेरी लावली आहे.

मात्र दुपारी काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.के. पांडे यांच्या निधनाने पदयात्रेला सावट आले. मात्र यातून सावरत कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत यात्रेतील काही जल्लोषाचे कार्यक्रम आवरते घेत यात्रा पुढे सुरु ठेवली. सायंकाळी राहुल गांधी थेट एका शेतकऱ्याच्या घरात गेले व त्यांनी या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT