BRS News : मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात बीआरएस पक्षाचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक पक्षातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करत आहेत. (Harshvardhan Jadhav News) अल्पावधीत मिळत असलेली लोकप्रियता आणि यश या पक्षाला काही पचनी पडतांना दिसत नाहीये. राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये प्रवेश केलेले कदीर मौलाना यांनी नुकतेच `औरंगजेब यांना मी आदर्श मानतो, तो एक चांगला राजा होता`, असे विधान केले होते.
त्यानंतर बीआरएस पक्षात एकच खळबळ उडाली. (Aurangabad) लगोलग पक्षाने ही पक्षाची भूमिका नसून कदीर मौलाना यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण बीआरएसच्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी केले. कदीर मौलाना यांनी देखील सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत औरंगजेबाबद्दल केलेले विधान हे आपले वैयक्तिक मत होते, त्याचा बीआरएस पक्षाशी काहीही संबंध नाही.
तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कालच कदीर मौलाना हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांच्यासोबत दिसले. औरंगजेबाबद्दल कदीर मौलाना यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना त्यांना जवळ कसे केले? हे योग्य नाही, अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली.
जे झाले ते चुकीचे झाले, ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले, त्याचे समर्थन कुणी कसे करू शकते? आणि अशा व्यक्तीला मुख्यमंत्री केसीआर जवळ कसे करतात? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थीत केला आहे. आपल्याला हे काही पटलेले नाही. जे पटत नाही, ते निमूटपणे सहन करणाऱ्यांपैकी मी नाही. आमदारकी, खासदारकी किंवा कुठल्याही पदासाठी झुकणाऱ्यांपैकी हर्षवर्धन जाधव नाही.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकी सोडणारा मी माणूस आहे. ज्या केसीआर यांच्या बंगल्यात त्यांच्या परवानगीशिवाय उंदीर देखील शिरू शकत नाही, त्या बंगल्यात औरंगजेबाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कदीर मौलाना यांना प्रवेश मिळतोच कसा? हे योग्य नाही, अशा शब्दात जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.