Jintur, District Parbhani
Jintur, District Parbhani Sarkarnama
मराठवाडा

जिंतुरमधील राडा प्रकरणी माजी आमदारांसह शंभर जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सरकारनामा ब्युरो

जिंतूर : औद्योगिक वसाहत संचालकपदाच्या निवडणुकीत भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला होता. (Bjp) दगडफेक आणि एकमेकांच्या अंगावर धावून जात गोंधळ घातल्या प्रकरणी आता दोन्ही बाजूच्या शंभर जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (Ncp)

रविवारी (ता.२७) जिल्हा परिषद प्रशालेतील मतदान केंद्रात मतदान सुरू असताना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही माजी आमदारांनी आपापल्या समर्थकांसह मतदान केंद्राबाहेर एकत्र येऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. (Parbhani) पोलीस निरीक्षक दिपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा शंभर जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या फिर्यादीनुसार रविवारी (ता.२७) सकाळी साडेनऊच्या सुमारास औद्योगिक वसाहतीसाठी मतदान सुरू असताना भाजपा समर्थक माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर,एॅड.गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी,लक्ष्मण बुधवंत,दत्ता कटारे, नागेश अकात, सचिन (मुन्ना) गोरे, सुमेध सुर्यवंशी,एकनाथ देशमुख, लक्ष्मण इलग,बार्शीकर,अशोक बुधवंत, डॉ.पंडित दराडे, मुटकुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तर राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे, बाळासाहेब भांबळे, बाळु काजळे,मनोज थिटे, हकीम लाला,कल्याण देशमुख,शोएब जानिमिया, रामचंद्र डोबे, दीपक शेंद्रे,शाहेद बेग मिर्झा,प्रल्हाद भांबळे, संजय निकाळजे,संजय भांबळे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या शंभर समर्थक कार्यकर्त्यांनी आपापसामध्ये झोंबाझोंबी करत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे या सर्व जणाविरुद्ध भादवि कलम १४३,१४७,१४९,५०४ व कलम ३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फौजदार कोकाटे पुढील तपास करत आहेत. या शिवाय अफवा पसरविल्याच्या कारणावरून काही संशयितांविरुध्द देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीवेळी माजी आमदार बोर्डीकर व माजी आमदार भांबळे यांच्या गटात झालेल्या वादा संबंधाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाष्य करून अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

दोन गटात भांडण होऊन त्यांच्यात शत्रुत्वाची, द्वेषाची भावना निर्माण व्हावी व त्यातून समाजात शांतता भंग व्हावा या उद्देशाने किंवा तसे होण्याच्या शक्यतेची जाणीव असतानासुद्धा वरील संदेश प्रसारित केला म्हणून वरिष्ठांच्या आदेशान्वये भादवि कलम ५०५(२) प्रमाणे संबंधित संशयितांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT