Danve-Nilam Gorhe News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve Vs Neelam Gorhe: `मी बोलायचे नाही का`? दानवे - उपसभापतींमध्ये खडाजंगी..

सरकारनामा ब्युरो

Shivsena News: सामजिक न्याय विभागाकडून बार्टी संस्थेमार्फत मागसवर्ग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण संस्थ्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी मांडली होती. (Danve-Nilam Gorhe News) यावर बोलत असतांना उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना सविस्तर न बोलता प्रश्न विचारा, असे सुचवले.

यावर मिठी नदीच्या लक्षवेधीला तुम्ही अर्धा तास दिला, मी पाच मिनिटेही झाली नाही, तर तुम्ही मला रोखतायं. मग मी बोलायचे नाही का? तुमची इच्छा असले तर मी बोलत नाही. (Shivsena) मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान मानतो, अशा शब्दात दानवे यांनी संताप व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब देखील दानवेंच्या मदतीला धावून आले.

त्यांनी देखील उपसभापतींना उद्देशून या सभागृहात विरोधी पक्षनेत्यालाच बोलू दिले जाणार नसेल तर काय उपयोग? विरोधी पक्षाने बोलायचे नाही का? असा सवाल केला. यावर उपसभापती गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी देखील आवाज चढवत ` मी बोलू नका असे कुठे म्हणाले. वेळेचे नियोजन करायचे नाही का? प्रश्नाऐवजी इतर चर्चेला अधिक वेळ दिला तर इतर सदस्यांना त्यावर बोलता येणार नाही. (Monsoon Session) एवढेच माझे म्हणणे आहे.

मला सभागृह चालवायचे आहे, ठरल्यानूसार वेळेचे नियोजन करायचे आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी बोलूच नाही, असे मी कुठे म्हटले आहे का? परब तुमची इच्छा असेल तर मी प्रस्ताव एवढी चर्चा करायला वेळ देते, असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काहीवेळासाठी चांगलेच तापले होते. यावर दानवे यांनी, मी प्रश्न विचारतो म्हणत या वादावर पडदा टाकला.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून गेली अनेक वर्ष किंवा त्यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या नेते, आमदारांचे गोऱ्हे यांच्यांशी असलेले संबंध बिघडल्याचे चित्र आज सभागृहात पहायला मिळाले. ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न देखील फसला. त्यामुळे सभागृहात अधूनमधून असे खडाजंगीचे प्रकार घडतांना दिसत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT