Mla Sanjay Shirsat, Sandipan Bhumre, Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Bhumre-Sattar : भुमरेंची ऑडिओ क्लीप ऐकली नाही, सत्तारांवरील आरोपांची दखल मुख्यमंत्री घेतील..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Sanjay Shirsat On Bhumre-Sattar) तर दुसरीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मनी लाॅन्डींग, अवैध वाळू उपसा यासह अनेक आरोप होत आहेत. या दोन्ही सहकाऱ्यांबद्दल शिवसनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना सावध प्रतिक्रिया दिली.

भुमरे यांची ऑडिओ क्लीप आपण ऐकली नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असे शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्पष्ट केले. तर सत्तार यांच्याविरोधात झालेले आरोप तक्रारींची दखल मुख्यमंत्री घेतील, तसेच त्यांना योग्य समज देतील असे शिरसाट म्हणाले. (Abdul Sattar) कुठलेही आरोप हे पुराव्यानिशी केले असतील तर त्याची निश्चित दखल घेतली जाते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या यावर बारकाईने लक्ष असते. संबंधित मंत्र्यांना ते वेळोवेळी समज आणि कानमंत्र देत असतात.

पण काही जणांना फक्त मिडियाशी बोलतांना आरोप करण्याची सवय असते. तुमच्या आरोपात तथ्य असेल, पुराव्यानिशी तुम्ही आरोप करत असाल, तर त्याची दखल सरकार निश्तिच घेत असते. (Shivsena) पण निराधात आरोपांची दखल घेण्याची गरज नसते. अब्दुल सत्तार यांच्यावरील आरोपात किंवा विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत तथ्य असेल तर त्याची चौकशी केली जाईल.

राहीला प्रश्न भुमरेंचा तर ती ऑडिओ क्लीप मी ऐकलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकत नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यावरून होत असलेल्या टीकेवरही शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. कोणाची सुरक्षा वाढवायची, कोणाची कमी करायची याचा निर्णय गृहविभागाने नेमलेली समिती घेत असते.

त्या समितीच्या शिफारशीनूसार सुरक्षेचा निर्णय घेतला जातो. बाळासाहेब ठाकरे यांना कायम झेड सुरक्षा होती, कारण त्याची त्यांना गरज होती. उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेबाबतीत गृह विभागाने जो निर्णय घेतला आहे, तो त्या समितीच्या सूचनेनूसार घेतला आहे, असेही शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT