Ashok Chavhan : Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavhan : "सामान्य लोकांचा पैसा बुडणार असेल तर.." ; अदानी प्रकरणी चव्हाण काय म्हणाले?

Ashok Chavhan On Adani : लोकांचा पैसा त्यांना मिळायला पाहिजे!

सरकारनामा ब्यूरो

Ashok Chavhan : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. अमेरिकन हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. अदानी समूहाचे शेअर्स कोसळत आहेत. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "आमच्या भविष्याच्या बाबतीत सरकार नेमकी काय आणि कधी भूमिका घेणार आहे? सामान्य माणसाने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य माणसासोबत आहे. आज देशभर आंदोलनं होत आहे. आपणं सगळे एकत्र येऊन आंदोलनं करूया, असे चव्हाण म्हणाले.

"देशभरातील अनेक लोकांचे पैसे एलआयसी मध्ये गुंतलेले आहे. अनेक लोकांनी एलआयसीमध्ये विमा काढलेला आहे. याबाबतीत केंद्र सरकारने यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे. याबाबतीत सरकारने कारवाई केली पाहिज या सगळ्या केंद्र सरकारच्या वित्तीय संस्था आहेत, असे चव्हाण म्हणाले.

'सामान्य लोकांचे पैसे एसबीआय आणि एलआयसी मधला पैसा अदानी यांच्या शेअर मध्ये गुंतवले गेले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स कोसळले अन् पैसे बुडाले, ही फारच चिंतेची बाब आहे," असे चव्हाण म्हणाले.

"तुमचाच पैसा, तुम्हाला मिळणार नसेल तर ही फार गंभीर बाब आहे, आज अदाणीच्या सगळ्या कंपनी तोट्यात सुरू आहेत. रिपोर्टवर आणि अहवालावर सरकारने आधीच लक्ष द्यायला हवं होतं. तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे, हीच आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे. हा कोणताही राजकीय प्रश्र्न नाही," हा सामन्य लोकांचा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT