Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz jaleel News: मोठी बातमी: इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Chhatrapati Sambhajinagar Election : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचार रॅलीत माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.

Jagdish Pansare

Aimim News: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचार रॅलीत माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी शेख नईम कुरेशी शेख छोटू कुरेशी, साजीद कुरेशी शरीफ कुरेशी आणि साहील कलीम कुरेशी या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी फेटाळले.

महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली 7 जानेवारीला शहरातील बायजीपुरा ते नवाबपुरा भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. उमेदवार फिरोज खान, मुन्शी भिकन शेख आणि अल्मास अमजद खान यांच्यासह शंभर ते दिडशे लोक रॅलीत सहभागी झाले होते.

रॅली बशीर लॉन्सजवळ आली असता आरोपी कलीम, हबीब, शकील, आवेज, आणि इतर यांनी घोषणा देवून रॅलीवर आणि पोलिसांवर अंडी फेकली, रॅली अडवून गोंधळ घातला. घोषणाबाजी केली.

तसेच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. जमावाने वाहनांची तोडफोड, दगडफेक, लाकडी दांडके व धारदार शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्यायालयात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तथा सरकारी वकील राजू पहाडिया यांनी त्यांच्या जामीन अर्जांना विरोध केला. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून राजकीय रॅलीत गोंधळ घातला. तसेच हल्ला करुन कारचे नुकसान केले.

त्यामुळे सदर हल्ल्यामागील आरोपींचा उद्देश काय होता याचा शोध घेवून शस्त्र जप्त करणे जरुरी आहे. आरोपींच्या पोलिस कोठडीशिवाय हे शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT