Mp Imtiaz Jaleel
Mp Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : हिजाब प्रकरणात न्यायालयाचा निर्णय लुच्या-लफंग्यांना प्रोत्साहित करणारा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : हिजाब हा मुस्लिम संस्कृतीचा एक भाग आहे. जस विविध जाती-धर्माचा पेहराव,संस्कृती आहे, त्याच प्रमाणे मुस्लिम महिला किंवा मुली आपला चेहरा हिजाबने झाकत असतील तर त्यावर बंदी घालणे अतिशय चुकीचे आहे. (Aimim) हिजाब घालणाऱ्या मुस्लिम मुलींना त्रास देणाऱ्या लुच्च्या-लफंग्यांना प्रोत्साहित करणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असेही ते म्हणाले. गेल्या काही महिन्यापासून कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणावरून देशात वादंग निर्माण झाले आहे. (Aurangabad) या वादाला राजकीय स्वरुप प्राप्त झाल्यानंतर तो अधिकच चिघळला. भगवा विरुद्ध हिजाब असे आंदोलनच कर्नाटक आणि देशाच्या काही भागात पहायला मिळाले.

या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्वपुर्ण निकाल देत शाळा, महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाचे हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केले आहे, तर हा निर्णय म्हणजे मुस्लिम विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक पंरपरेवर घाला असल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून केला जातोय.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडत कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. इम्तियाज जलील म्हणाले, देशाच्या सर्वोच संसदेत जिथे मी व सगळ्या राजकीय पक्षांचे खासदार, मंत्री बसतात त्या सभागृहात अनेक राजस्थानमधील आमच्या राजपुत भगिनी घुंगट घालून बसतात, अनेक खासदार असलेले साधू मांडी घालून आसनाच्या स्थितीत बसतात.

तिथे कुणीही कधी आक्षेप घेतला नाही. कारण ही ज्याची त्याची संस्कृती आहे. हिजाब परिधान करणे ही मुस्लिम महिला, मुलीची संस्कृती आहे, त्यावर बंदी घालणे म्हणजे या विषयावरून राजकारण करणाऱ्यांना, हिजाब घालणाऱ्या मुलींना भगवे उपरणं घालून त्रास देणाऱ्या लुच्च्या-लफंग्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे. मुस्लिम समाजातील मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण हे देशातील इतर कुठल्याही समाजातील मुलींपेक्षा खूप कमी आहे.

शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज किती मागासलेला आहे हे सच्चर समितीसह आतापर्यंतच्या सगळ्यांनीच नमूद केले आहे. आता कुठे मुस्लिम समाज आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करू लागला आहे, शाळा, महाविद्यालयात पाठवून त्यांना देखील साक्षर आणि मोठं होण्यासाठी प्रयत्न करू पाहत आहे. अशावेळी हिजाब बंदी सारखे निर्णय घेऊन पुन्हा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे.

या मुद्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे अशा निर्णयांमुळे फावेल आणि जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल. आज समाजात अनेक तरुणी या जीन्स, स्कर्ट, साडी किंवा इतर पेहराव करून वावरतात. त्यांच्यावर कधी कुणी बंधने लादली नाही, कारण ती त्यांची संस्कृती आहे. मग हिजाब ही मुस्लिम विद्यार्थीनी, महिला, मुलींची संस्कृती असतांना त्यावर बंदी घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT