Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel : इम्तियाज-शिरसाट समर्थकांमध्ये हाणामारी! परस्परविरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल

Tension in Aurangabad as Imtiaz Jaleel's supporters allegedly assault Shirsat supporters over social media posts. Both sides file cross FIRs. : इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या कारणावरून, बालाजी खोतकर, मनोज भारसाखळे, किरण साळवे, सावजी म्हस्के या चौघांनी शिरसाट समर्थकांना मारहाण केल्याची तक्रार आहे.

Jagdish Pansare

Shivsena-Aimim News : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर कुटुंबियांच्या नावावर बेकायदा मालमत्ता खेरदीचा आरोप केल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. दोघांचेही समर्थ आक्रमक झाले असून इम्तियाज यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत मोर्चा काढण्याची तयारी काही संघटनांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावरही शिरसाट-इम्तियाज समर्थक भिडल्याचे चित्र आहे. विरोधात पोस्ट का केली? याचा जाब विचारत काही इम्तियाज समर्थकांची शिरसाट समर्थकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला.

त्यानंतर शिरसाट (Sanjay Shirsat) समर्थकही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये राडा झाला. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी पोलीसात धाव घेत एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. एकूणच शिरसाट-इम्तियाज यांच्यातील वादाला आता रस्त्यावरील लढाईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 23 जून रोजी इम्तियाज जलील यांच्या अटकेची व त्यांना हद्दपार करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोघांच्याही समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

शहरातील ब्रिजवाडी रमाई चौक गल्लीत, मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या कारणावरून, बालाजी खोतकर, मनोज भारसाखळे, किरण साळवे आणि सावजी म्हस्के या चौघांनी घरासमोर येऊन मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर 27 वर्षांच्या महिलेनं दुसरी तक्रार दाखल केली आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचे पती बालाजी खोतकर हे विजय चाबुकस्वार, किरण अंगुरे आणि शुभम अंगुरे या शेजाऱ्यांच्या सततच्या भांडणांनी त्रस्त होते. त्यांनी याबाबत विचारणा केली असता, तिघांनी मिळून खोतकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः मला आमच्यावर दबाव आहे. आम्ही काय करावे? संजय शिरसाट आम्हाला धमक्या देतात असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT