MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : एमआयएमची खेळी, मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात इम्तियाज जलील ?

Imtiaz Jalil against Minister Atul Save from MIM? : यापूर्वी 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकीत एमआयएमचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि शहरातील पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता एमआयएम ने आपले लक्ष या दोन्ही मतदारसंघावर केंद्रित केले आहे.

Jagdish Pansare

AIMIM Marathwada Political News : एमआयएम चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या संभाजीनगर दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे विधानसभेसाठी राज्यातील पक्षाच्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. छत्रपती संभाजीनगर चे माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर केली. पण ते कोणत्या मतदारसंघातून लढणार ? याचा सस्पेंस मात्र कायम ठेवला. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही गुप्तता पाळण्यात आल्याचे बोलले जात असले तरी ओवेसी यांनी त्यांना मध्य ऐवजी पुर्व मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे.

एमआयएमने (Aimim) दोन वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गफ्फार कादरी हे दोन्ही वेळा थोड्या मतांनी पराभूत झाले होते. तिसऱ्यांदा ही चूक नको, म्हणून ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांना मध्य ऐवजी पुर्वमधून निवडणुक रिंगणात उतरवण्याचे निश्चित केल्याचे बोलले जाते. असे झाले तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची डोकेदुखी वाढणार आहे. ओवेसी यांची ही खेळी यशस्वी झाली तर महायुतीची हक्काची जागा धोक्यात येऊ शकते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरी भागात एमआयएमला भरभरून मतदान झाले होते. औरंगाबाद पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना मोठी आघाडी मिळाल्यामुळे महायुतीच्या विद्यमान आमदारांना आधीच धडकी भरली आहे. त्यात ओवेसी यांनी पूर्वमध्ये खेळाडू बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुर्व मधून डाॅ. गफ्फार कादरी यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

यापूर्वी 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकीत एमआयएमचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला होता. (Imtiaz Jaleel) लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि शहरातील पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता एमआयएम ने आपले लक्ष या दोन्ही मतदारसंघावर केंद्रित केले आहे. शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीनही मतदार संघात एमआयएम उमेदवार देण्याची शक्यता आहे. पैकी पूर्व मध्ये गफार कादरी यांच्या ऐवजी इम्तियाज जलील उमेदवार असतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हा मतदार संघ खेचून आणण्याच्या दृष्टीने ओवेसी यांनी टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्या भांडणात पूर्व मध्ये एमआयएमची लॉटरी लागू शकते. तर ज्या मध्य विधानसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील पहिल्यांदा आमदार झाले, त्या मतदारसंघात देखील ओवेसी नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून एमआयएम महाविकास आघाडी सोबत जाणार, अशा चर्चा होत्या.

स्वतः इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीकडे आपण युतीसाठी युतीसाठी प्रस्ताव दिल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडीकडून काही प्रमुख नेत्यांनी आमच्याशी चर्चा केल्याचा दावाही त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ओवेसींच्या संभाजीनगर दौऱ्यात आम्ही इच्छुक उमेदवारांना अर्जांचे वाटप करणार, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज संभाजीनगरात आलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमच्या महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT