Imtiaz Jalil News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : `सफेद कपडो मे काले कारनामे करनेवाले बहोत देखे है `, इम्तियाज यांचा टोला कुणाला ?

Marathwada Political : कधी नव्हे ते शहराला केंद्र आणि राज्याचे मिळून सहा मंत्री मिळाले आहेत. आणखी एक मंत्रपदाच्या रांगेत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : `अमृत भारत स्टेशन` योजनेअंतर्गत राज्यातील ४४ रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरण आणि सौदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. (Imtiaz Jalil News) औरंगाबाद येथे या कार्यक्रमात सहभागी झालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे काळे कपडे घालून आले होते. त्यामुळे त्यांच्या या पेहरावाची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. याचा उल्लेख व खुलासा इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात करतांना जोरदार टोलेबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद (Aurangabad) रेल्वेस्थानकाचा अमृत स्टेशन योजनेत समावेश केल्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे. आपण या कार्यक्रमाला काळे कपडे घालून आल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल ? की मी निषेध तर व्यक्त करत नाहीये ना, पण तसे काहीही नाही. (Imtiaz Jalil) `लेकीन सफेद कपडो मे काले कारनामे करनेवाले बहोत देखे है, इसलिये मै काले कपडे पहेन के आया हू`, असा टोला त्यांनी लगावला.

विषेश म्हणजे व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, (Dr.Bhagwat Karad) गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थीत होते. औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण आणइ सौदर्यीकरण हे पंधरा वर्षांपुर्वीच झाले पाहिजे होते. राज्यातील पर्यटन राजधानी म्हणून या शहराचे महत्व आहे. इथे हजारो पर्यटक येतात, पण आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देखील इथून विमानेच नाहीत.

विशेष म्हणजे कधी नव्हे ते शहराला केंद्र आणि राज्याचे मिळून सहा मंत्री मिळाले आहेत. आणखी एक मंत्री रांगेत आहेत, माझी इच्छा आहे की, संजय शिरसाट यांना देखील मंत्रीपद मिळावे. ते मंत्री झाले तर सात मंत्री असणारा हा जिल्हा ठरेल, त्यामुळे आपल्याला या पेक्षा `अच्छे दिन` काय असू शकतील? असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला.

देशाच्या बॅंका आणि तिजोरी ज्यांच्या ताब्यात आहे, ते डाॅ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री आहेत, तर रेल्वेचे प्रश्न सोडवू शकतील असे रावसाहेब दानवे हे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवेच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने होणे अपेक्षित आहे. डाॅ. कराड यांनी आपल्या भाषणात या संदर्भात घोषणा करावी, की औरंगाबादेतून देशाच्या सर्व भागात विमानसेवा पोचवण्यात येईल, तर मी त्यांचे अभिनंदन करील. पण ते घोषणा मोठ्या मोठ्या करतात प्रत्यक्षात काम काही होत नाही, असा चिमटा देखील इम्तियाज यांनी यावेळी काढला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT