Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या सरकारी दौऱ्यात देवदर्शन अन् पक्ष बैठका..

सरकारनामा ब्युरो

Aimim : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्री प्रल्हाद पटेल हे आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. हा त्यांचा अधिकृत शासकीय दौरा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. (Bjp)परंतु हा शासकीय दौरा असून देखील त्यांच्या खात्यांशी संबंधित उद्योगांविषयी किंवा जलशक्ती मिशन संदर्भात एकही बैठक किंवा कार्यक्रम त्यांच्या दौऱ्यात नमूद करण्यात आलेला नाही.

नेमकं यावरून (Aimim) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी पटेल यांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न उपस्थितीत केला आहे. पटेल यांच्या दौऱ्यासंदर्भात इम्तियाज जलील यांनी एक ट्विट करत याबद्दल आश्चर्य व्यक्त करतांनाच हे कसे शक्य आहे, आम्हाला कळेल का? असा सवाल देखील उपस्थीत केला आहे.

पक्ष, संघटना वाढीची जबाबदारी मोदी-शहांनी देशातील प्रत्येक मंत्री, खासदार, आमदार यांच्यावर सोपवली आहे. हे नेते आपल्याला ठरवून दिलेल्या भागात किंवा राज्यांमध्ये जावून बैठका, मेळावे, सभा घेवून पक्ष बांधणीचे काम करत असतात. त्यात काही गैर देखील नाही. पण पक्षाचे दौरे आणि त्या निमित्ताने केले जाणारे देव दर्शन जर सरकारी खर्चातून होत असेल तर मग ते कुणीही मान्य करणार नाही.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती विभागाचे केंद्रीय मंत्री यांचा अधिकृत महाराष्ट्र दौरा असाच वादात सापडला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने काही प्रस्न उपस्थिती केले आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील म्हणतात, कसं शक्य आहे, एका केंद्रीय मंत्र्याच्या अधिकृत ३ दिवसांच्या दौऱ्यात त्यांच्या उद्योग, जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया या महत्त्वाच्या खात्यांपेक्षा मंदिर भेटी आणि पक्षाच्या बैठका जास्त असतात! पंतप्रधान मोदी आणि भाजपने कृपया या दौऱ्याबद्दल अधिकृत काय आहे ते स्पष्ट करावे. आता भाजपकडून याला काय उत्तर दिले जाते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT