Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : तुम्ही न्यायालयाला मोजले नाही, आम्ही तुम्हाला मोजत नाही ; आंदोलन सुरूच राहणार..

Marathwada : तुम्ही जर न्यायालयाला मानत नसाल, त्यांची धज्जीया उडवणार असाल, तर मग आम्हीही तुम्हाला मोजत नाही.

Jagdish Pansare

Aimim : औरंगाबादच्या नामांतरावरून सुरू असलेले साखळी उपोषण सुरूच राहणार असे खासदार इम्तियाज जलील यांनी ठणकावून सांगितले. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नामांतराच्या विरोधातील आंदोलन आता थांबले पाहिजे, अशी अपेक्षा प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली होती.

त्याचा दाखला देत इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी ` तुम्ही न्यायालयाचा मोजले नाही, आम्ही तुम्हाला मोजत नाही`, असे म्हणत फडणवीस यांनी आंदोलन थांबवण्याचे केलेले आवाहन धुडकावून लावले. (Aimim) इम्तियाज जलील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलन थांबले पाहिजे हा बाईट मी पाहिला, आता तर हे आंदोलन सुरूच राहणार.

शहराच्या नामांतराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना सरकारने निर्णय घेतला कसा? तुम्ही जर न्यायालयाला मानत नसाल, त्यांची धज्जीया उडवणार असाल, तर मग आम्हीही तुम्हाला मोजत नाही. नामांतराविरोधीतील आंदोलन सुरूच राहणार असा, इशारा इम्तियाज यांनी आंदोलनस्थळी केलेल्या भाषणात दिला.

नामांतराच्या विरोधात इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या संदर्भात नुकतेच शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून शहराचे वातावरण खराब होवू नये, यासाठी मार्ग काढण्याची विनंती केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदोउदो होणार नाही, छत्रपती संभाजीनगर नामांतर आता झाले आहे, त्यामुळे या विरोधात सुरू असलेले आंदोलन देखील थांबले पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. यावर इम्तियाज जलील यांनी नामांतराचे प्रकरण न्यायालयात असतांना तुम्ही निर्णय कसा घेतला. न्यायालयाच्या आदेशाला तुम्ही जुमानले नाही, मग आता आम्ही देखील तुम्हाल जुमानत नाही, आंदोलन सुरूच राहील, असा आक्रमक पावित्रा घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT