Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : कुण्या अधिकाऱ्याला वाटले म्हणून नको ; पुरावे असतील तर निश्चित कारवाई करा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडिया अर्था पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर धाडी टाकत एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी शेकडो तरुणांना अटक केली आहे. (Aimim) दोन टप्यात एकाच वेळी महाराष्ट्रासह देशभरात हे धाड व अटक सत्र झाले. देशातील मोठा दहशतवादी कट उधळल्याचा दावा केंद्राकडून केला जात आहे. (Aurangabad) या कारवाईच्या विरोधात काही मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत, यातून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा आरोप करत मनसे व इतर राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या सगळ्या प्रकारावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एटीएस किंवा केंद्रीय तपास यंत्रणांकडे दहशतवादी कारवायासंदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी निश्चितच कारवाई करावी, त्याला आम्हीच काय कुठलाच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना किंवा व्यक्तीगत विरोध करण्याचे कारण नाही. शेवटी कोणत्या पुराव्याच्या आधारे ही कारवाई केली गेली हे गुप्त आहे, ते कुणालाच माहित नाही. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेतील एखाद्या अधिकाऱ्याला वाटले म्हणून कारवाई, अटक केली जाऊ नये, असे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

पीएआयच्या देशभरातील कार्यालयावर छापे आणि शेकडो पदाधिकाऱ्यांच्या अटक सत्राने देशातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा कारवाई करत एटीएस आणि तपास यंत्रणांनी राज्यातून शंभरहून अधिक जणांना अटक केली आहे. या कारवाईला विरोध दर्शवला जात असतांना एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा कारवाई होते, तेव्हा एटीएस किंवा केंद्रीय तपास यंत्रणेकडे निश्चितच पुरावे असतील, त्याशिवाय ते कारवाई करणार नाही. आणि जर तसे पुरावे असतील तर एमआयएमच काय, कोणताच राजकीय पक्ष पीएफआयचे समर्थन करणार नाही.

परंतु पुराव्याशिवाय जर अशी कारवाई होत असेल, तरुणांना उचलले जात असले तर ते देखील चुकीचे आहे. कारण यापुर्वी दहशतवादाशी संबंधित व्यक्ती म्हणून झालेल्या कारवायांमध्ये दहा दहा वर्ष तरुणांना तुरुगांत डांबून ठेवण्यात आले होते. नंतर न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले, त्यांची सुटका करण्यात आली याची अनेक उदाहरणए आहेत. पण दोष नसतांना ज्यांच्या आयुष्याची दहा दाह वर्ष तुरूंगात गेली त्याला जबाबदार कोण? हा देखील प्रश्न आहे.

असे वारंवार घडू नये एवढीच या निमित्ताने अपेक्षा आहे. पीएफआय प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या संदर्भातील पुरावे एटीएस, तपास यंत्रणांनी कोर्टाकडे बंद लिफाफ्यात दिले आहेत. त्यामुळे दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे. अटक झालेल्या अनेक तरुणांचे कुटुंब आमच्याकडे येत आहेत, त्यांना देखील आम्ही हेच सांगत आहोत, तुमचा मुलगा निर्दोष असेल तर त्याची लवकरच सुटका होईल, पण दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईलच, असे आम्ही त्यांना सांगत असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT