MNS Leader Abhijit Panse-Imtiaz Jalil
MNS Leader Abhijit Panse-Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

इफ्तारला बोलावणाऱ्या इम्तियाज यांनी आमच्याकडे दिवाळी, पाडवा, गणपती दर्शनाला यावे..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या जाहीर सभेच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (MNS) राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर मनसेच्या अन्य नेत्यांकडून शिवसेना व इतर विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली जात आहे. राजसभेवर प्रतिक्रिया देतांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी सभेला जाण्यापुर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माझ्या घरी इफ्तारला यावे, असे म्हटले होते.

या संदर्भात मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी देखील इम्तियाज यांनी आमच्याकडे दिवाळी, गुडीपाडवा, होळी आणि गणपती दर्शनाला यावे, त्यांचे स्वागत करू, असा टोला लगावला आहे. (Aurangabad) शिवसेनेवर टीका करतांना सत्ता असूनही यांना शहराचे नाव संभाजीनगर करता आलेले नाही. संभाजीनगर हे मनसेचे आहे, तर औरंगाबाद शिवसेनेचे असा टोलाही पानसे यांनी लगावला.

राज ठाकरे यांचे शहरात आगमन झाले असून क्रांतीचौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तिथून त्यांच्या मोटारींचा ताफा रामा हाॅटेलात दाखल झाला. मनसेचे नेते कालच शहरात दाखल झाले आहेत, तर काही राज ठाकरे यांच्यासोबत आले आहेत.

मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील तसेच शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीच निमंत्रण देणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी आमच्याकडे दिवाळी, गुढीपाडवा,होळी गणपति दर्शनासाठी यावं आम्ही त्यांचं स्वागत करू, असे त्यांनी म्हटले आहे.

तर आमदार अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे सांगत राज्यात सत्ता असून देखील तुम्हाला औरंगाबादचे संभाजीनगर का करता आले नाही? असा सवाल केला. ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांना आता हिंदुत्वाची नव्याने जाग आली आहे. उद्याच्या राज ठाकरे यांच्या सभेकडे देशाचे लक्ष लागले असून ते विरोधकांना उद्या आपल्या भाषणातून उत्तर देतीलच, असेही स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT