Imtiaz Jaleel sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : देशातील सर्वात मोठा जल्लोष संभाजीनगरमध्ये; 4 जूनपूर्वीच इम्तियाज जलील यांनी निकाल सांगितला

Sunil Balasaheb Dhumal

Chhatrapati Sambhajinagar Politics : भाजपने अब की बार चार सौ पार म्हणत लोकसभा निवडणुकीचा देशभर माहोल तयार केली. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील सर्वात मोठा जल्लोष साजरा केला जाणार असल्याचा दावा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच राज्यात कुणाला किती जागा मिळणार याचे भाकितही त्यांनी वर्तवले आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, राज्यात सर्वात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी 45 जागा जिंकण्याचा दावा करत येथून एमआयएमला उखडून फेकण्याची भाषा केली होती. तसेच या मतदारसंघात कमळ फुलवण्याचा आवाहनही केले होते. मात्र मराठी लोकांमध्ये एक प्रकारचा तेढ निर्माण करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा हल्लाबोल इम्तियाज जलील यांनी केला.

या निवडणुकीत अनेक लोकांनी काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरेंना साथ दिल्याचे दिसून आले. भाजपने मात्र स्वार्थापोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भाजपचे फोडाफोडीच्या राजकारण लोकांना अवडलेले नाही. आता देशात भाजपचे 400 पार चे काय होईल माहीत नाही, राज्यातील चित्र मात्र नक्कीच वेगळे असणार आहे, असा दावाही इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी केला.

राज्यात येऊन अमित शाहांनी Amit Shah मिशन 45 चा दावा केला होता. त्यानंतर त्यात घट होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 41 वर आले. आता त्यांनी जे काही दावे केले आहेत त्यातील निम्म्या जागा त्यांना मिळाल्या तरी खूप झाले, असा टोला लगावत छत्रपती संभाजीनगरमध्ये मीच जिंकणार असा दावाही इम्तियाज जलील यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील सर्वात मोठा जल्लोष होणार आहे. तो सजारा करण्यासाठी सर्वांना निमंत्रण देतो. आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक निवडणुकीत आहे. रिक्षा चालवणारे कोट्यवधींचे मालक झाले. राजकीय असे एकमेव क्षेत्र आहे की तेथे शेकडो कोटींनी उत्पन्न वाढवता येते. भाजपमध्ये असे 300 खासदार असल्याने पंतप्रधान मोदी निवडणुकीत सुधारणा आणणार नाहीत, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT